Mla Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On ministership News : मंत्रीपद मिळणार का ? केसरकरांनी संकेत दिले पण शिरसाटांचा विश्वास बसेना..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू असलेला मंत्रीमंडळ विस्तार अखेर दोन दिवसांत होणार असल्याचे सांगितले जाते. (Sanjay Shirsat On ministership News) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक काल पार पडली. या बैठकीत कुणाला मंत्रीमंडळात स्थान द्यायचे याची यादी देखील अंतीम करण्यात आल्याचे समजते. शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी देखील तसे संकेत दिले आहेत.

शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची देखील या मंत्रीमंडळ विस्तारात वर्णी लागणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात संजय शिरसाट यांना विचारले असता, ते म्हणाले केसरकर यांना अधिकची माहिती असेल, पण मला अद्याप यासंदर्भात काहीही माहिती नाही. (Shivsena) त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारात माझे नाव असेल की नसले हे मुख्यमंत्री शिंदे हेच ठरवतील.

गेली पंधरा वर्ष मी विधानसभेचा सदस्य म्हणून काम करतोय, त्यामुळे मंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा असणे चुकीचे नाही. (Marathwada) त्यामुळे केसरकरांनी सांगितले असले तरी दोन दिवसांत सगळेच स्पष्ट होईल, अशा शब्दात शिरसाट यांनी संयमित प्रतिक्रिया दिली. राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्याच मंत्रीमंडळात संजय शिरसाट यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. पण मराठवाड्यातून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि भाजपकडून अतुल सावे यांना मंत्रीपद देण्यात आले होते.

एकाच जिल्ह्यात तीन मंत्री असल्यामुळे शिरसाट यांना तेव्हा पुढच्या विस्तारात स्थान दिले जाईल, असे आश्वास देण्यात आले होते. मात्र मंत्रीमंडळ विस्तार लांबला, अनपेक्षितपणे राष्ट्रवादीची सरकारमध्ये एन्ट्री झाली. त्यांना पहिल्याच झटक्यात ९ मंत्रीपद मिळाली. त्यामुळे वेटिंवर असलेल्या शिंदे आणि भाजपच्या आमदारांची अस्वस्थता वाढली होती.

आता पावसाळी अधिवेशनापुर्वी हा विस्तार केला जाणार असून येत्या दोन दिवसांतच तो होईल, असे शिरसाट यांनी सांगितले. निवडणुकीला दीड वर्षाचा कालवधी राहिला आहे. लोक आता राजकारणाला कंटाळले आहेत, त्यांना वेगवान विकास हवा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मंत्रीमंडळ विस्तार अधिवेशनाच्या पुर्वी व्हावा यासाठी आग्रही होते. त्यामुळे हा विस्तार उद्या, की परवा होईलच, असा दावा देखील शिरसाट यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT