Woman Assault Case : महिला रुग्णावर अत्याचार करून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या भाजप शहराध्यक्षासह एका डाॅक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. फुलंब्रीचे भाजप शहराध्यक्ष उत्तम भागाजी ढोके आणि डाॅ. रामदास तरटे यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला डोकेदुखीचा त्रास असल्याने ती फुलंब्री येथील समर्थ क्लिनिकमध्ये गेली होती. संशयित आरोपींनी महिलेला उपचाराच्या नावाखाली गुंगीच्या गोळ्या दिल्या. महिलेने या गोळ्या घेतल्यानंतर आरोपी डाॅ. तरटे यांनी तिच्यावर अत्याचार केला.
महिलेने या विषयी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपींना अटक केली. आरोपींवर अॅट्रोसिटी अंतर्गत गु्न्हा दाखल झाला आहे.
डाॅक्टर तरटे याला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर कोणी व्हायरल केला याचा तपास पोलिस करत होते. याच तपासात पोलिसांनी भाजपचे शहराध्यक्ष उत्तम ढोके यांचा सहभाग आढळून आला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरटे याने अटक होण्यापूर्वी 16 ऑक्टोबरला पोलिसांनी निवेदन दिले होते. त्यामध्ये उत्तम ढोकेच्या नातेवाईकाने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच तो व्हिडिओ व्हाॅट्सअप पाठवला होता. त्यामुळे उत्तम ढोके यांनी हा व्हिडिओ तयार बनवल्याचा संशय आला. त्यानंतर ढोके यांना अटक करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.