Yavatmal missing girls : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांचं केलेल्या लैंगिक शोषण, नाशिकमधील 'TCS' कंपनीतील लैंगिक अन् धर्मांतरप्रकरण, रवींद्र एरंडे याचे गाजत असलेले लैंगिक शोषण, अमरावती परतवाडा इथलं अयान अहमद याने अल्पवयीन मुलींचे केलेलं शोषणावरून राज्य हादरलं आहे.
या सर्व प्रकरणांचा 'SIT' मार्फत तपास सुरू आहे. हे प्रकरण गाजत असतानाच, यवतमाळमधून राज्याला हादरवणारा प्रकार समोर आला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यातील तब्बल 34 मुली बेपत्ता झाल्या असून, त्यामागे 'लव जिहाद'चा प्रकार असल्याचा संशय भाजपने व्यक्त केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात 34 आदिवासी मुली गायब झाल्या आहे. यामागे मानवी तस्करी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात एक आॅडिओ क्लिप भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांच्या हाती लागली आहे. यावरून त्यांनी 'लव जिहाद'चा प्रकार व्यक्त केला आहे.
बेपत्ता होत असलेल्या मुलींपैकी, एक मुलगी आणि तिच्या प्रियकराची ऑडिओ क्लिप प्रफुल चव्हाण यांच्या हाती लागली आहे. त्यात कश्या पध्दतीने मानवी तस्करी केली जाते, हे सांगितलं जातं आहे. परंतु हे प्रकरण पोलिस (Police) गांभीर्याने घेत नाही, असा दावा प्रफुल चव्हाण यांनी व्यक्त केला.
आदिवासी मुली गायब होण्यामागे राळेगावमधील एक मुस्लिम व्यक्ती असल्याचा दावा करताना, प्रफुल चव्हाण यांनी संबंधिताचे नाव देखील जाहीर केले आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी त्याला सोडून दिले. यानंतर संबंधित मुस्लिम व्यक्ती तेलंगणामध्ये पळून जात असताना त्याला पुन्हा पकडले.
संबंधित संशयितला पोलिसांकडूनच मदत होत असून, संबंधित पोलिसांना तपासापासून दूर ठेवावे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
आदिवासी मुलींच्या पालकांना पैसेचे आमिष देऊन, फूस लावली जात आहे. ही गंभीर बाब असून, याबाबत गृह विभागाकडे याची माहिती दिली आहे. राज्य सरकार यावर गंभीर असून, यात 'लव जिहाद', 'धर्मांतर', असा अँगल असू शकतो. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.