Ajit Pawar-Yogesh Kshirsagar Controversy In Beed News Sarkarnama
मराठवाडा

Yogesh Kshirsagar News : अजित पवारांची टीका योगेश क्षीरसागरांच्या जिव्हारी; पक्ष माझ्या मालकीचा नाही तुमच्याच काकांचा, नीट सांभाळा!

Yogesh Kshirsagar-Ajit Pawar Controversy : जेव्हा मला फोन आला की ते सगळे एबी फॉर्म स्वतःकडे मागत आहेत त्यावेळी मी स्पष्टपणे नकार दिला. हा पक्ष काही कोणाच्या एकाच्या मालकीचा नाही. त्यामुळे असं चालणार नाही.

Jagdish Pansare

  • अजित पवारांच्या टीकेवर योगेश क्षीरसागर यांनी जोरदार पलटवार करत "पक्ष माझ्या मालकीचा नाही, तुमच्या काकांचा" असे तीव्र विधान केले.

  • या वक्तव्यामुळे एनसीपीच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • क्षीरसागरांचे विधान राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि वादाला तोंड फोडत असून आगामी घडामोडींवर सर्वांचे लक्ष आहे.

Beed Municipal Council News : बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार आणि एबी फॉर्म माझ्याकडे द्या, अशी मागणी योगेश क्षीरसागर यांनी केली होती, असा आरोप अजित पवार यांनी बीडच्या सभेत केला होता. पण ही मागणी पूर्ण होत नाही हे लक्षात येताच योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जाते. भाजपच्या मंत्री आणि जिल्ह्यातील नेत्या पंकजा मुंडे यांचा हा मास्टर स्ट्रोक असल्याचे बोलले गेले.

दरम्यान योगेश क्षीरसागर यांना गेवराईच्या पंडित कुटुंबाचा विरोध होता आणि त्यातून बीड नगर परिषदेतील क्षीरसागर घराण्याची मक्तेदारी मोडून काढण्याचा निर्णय पक्ष पातळीवर झाला होता, अशी चर्चा आहे. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची बीडमध्ये काल सभा झाली. यावेळी अजित पवार यांनी योगेश क्षीरसागर आणि एकूणच क्षीरसागर कुटुंबावर जोरदार टीका केली. पाच वर्षे सत्ता माझ्या हातात द्या, जी कामे 35-40 वर्षात झाली नाही ती मी तुम्हाला करून दाखवतो असा, शब्द त्यांनी बीडकरांना दिला.

बीडची दुरावस्था, रस्त्यांची परिस्थिती, महिन्याला येणारे पाणी, वाढती गुंडागर्दी अशा सगळ्याच मुद्द्यांना हात घालत अजित पवारांनी क्षीरसागर कुटुंबाच्या मक्तेदारीला आव्हान दिले. योगेश क्षीरसागर यांनी सगळे 'एबी फॉर्म' आपल्याकडे द्यावे, अशी मागणी केल्याचा दावा करत 'तुम्ही का पक्षाचे मालक झाला आहात का'? असा सवाल अजित पवार यांनी केला होता. उमेदवारी देताना सगळ्यांनी एकत्रित बसून निर्णय घेणे अपेक्षित असते. त्याप्रमाणे आम्ही ठरवले, मात्र जेव्हा मला फोन आला की ते सगळे एबी फॉर्म स्वतःकडे मागत आहेत त्यावेळी मी स्पष्टपणे नकार दिला. हा पक्ष काही कोणाच्या एकाच्या मालकीचा नाही. त्यामुळे असं चालणार नाही हे मी ठणकावून सांगितलं.

अजित पवारांच्या या दाव्यानंतर योगेश क्षीरसागर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या, अशी मागणी मी कधीच केली नव्हती. अजितदादांना येथील स्थानिक कार्यकारणीतील टोळक्याने चुकीचे फीडबॅक दिले असेल तर मला याची कल्पना नाही. राहिला प्रश्न पक्ष कोणाच्या मालकीचा? तर तो माझ्या मालकीचा आहे असे मी कधीच म्हणालो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुमच्याच काकाचा आहे, तुम्ही तो नीट सांभाळा, असा टोला क्षीरसागर यांनी लगावला.

चुकीची माहिती अजित पवारांना दिल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे आमचा संपर्क होऊ शकला नाही किंवा त्यांच्याकडूनही तसा प्रयत्न झाला नाही. खालच्या कार्यकारिणीने एखादी गोष्ट किंवा माहिती वरिष्ठ नेत्यांना सांगितली तर त्यांनी याची किमान शहानिशा करायला हवी होती, असे म्हणत योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आपण सर्व एबी फॉर्म मागितल्याचा आरोप फेटाळून लावला.

नगरपरिषदेच्या प्रचाराला आता बीडमध्ये रंगत आली आहे. क्षीरसागर विरुद्ध पंडित असा थेट संघर्ष या निमित्ताने पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगदी दोन दिवस आधी योगेश क्षीरसागर यांनी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेत भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे कधी नव्हे ते भाजपला बीड नगर परिषदेत संपूर्ण 52 उमेदवारांचे पॅनल उभे करता आले. योगेश क्षीरसागर यांनी ऐनवेळी दगा दिल्यामुळे अजित पवारांनी थेट क्षीरसागर घराण्याची नगरपरिषदेतील मक्तेदारी मोडून काढण्याचा विडाच उचलल्याचे कालच्या त्यांच्या आक्रमक भूमिकेवरून दिसून आले.

5 FAQs (Marathi)

1. योगेश क्षीरसागरांनी हे विधान का केले?
अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी हा कडक शब्दांत पलटवार केला.

2. या वक्तव्याचा एनसीपीवर काय परिणाम होऊ शकतो?
तणाव वाढण्याची आणि पक्षात आणखी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

3. अजित पवारांनी काय टीका केली होती?
क्षीरसागरांच्या भूमिकेवर आणि कामकाजावर अप्रत्यक्ष टीका केल्याचे सांगितले जाते.

4. क्षीरसागर कोणत्या गटात आहेत?
ते भाजपमध्ये आहेत..

5. यामुळे आगामी निवडणुकांवर काही परिणाम होईल का?
होय, गोंधळ आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता, तसेच गटबाजी वाढल्यास नुकसानही संभवते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT