Mla Meghna Bordikar- Rupali Chakankar
Mla Meghna Bordikar- Rupali Chakankar Sarkarnama
मराठवाडा

तुम्ही वडाला फेऱ्या मारत नाही, पण व्रत करणाऱ्या महिलांच्या भावना का दुखावता ?

सरकारनामा ब्युरो

परभणी : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने एक विधान केले आणि त्याची चर्चा होऊ लागली. (Parbhain) ` मी लग्न झाल्यापासून एकदाही वडाला फेऱ्या मारल्या नाहीत. माझ्या सासरच्या मंडळीनी देखील तसा आग्रह कधी धरला नाही`, असं चाकणकर म्हणाल्या. त्यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद आता उमटायला सुरूवात झाली आहे.

जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी रुपाली चाकणकर यांच्या विधानवर प्रतिक्रिया देत त्यांना टोला लगावला आहे. (Marathwada) मेघना बोर्डीकर यांनी या संदर्भात एक ट्विट केले असून त्यात त्या म्हणतात `वडाला फेऱ्या मारणं महत्वाचं नसतं. त्यातील भावना महत्वाची आहे. आपल्या माणसासाठी कुठल्याही पातळीला जायची तयारी ठेवणं, हा त्यामागचा खरा संदेश आहे.

तुम्ही करत नाही. पण व्रत न करण्याचा गवगवा करून व्रत करणाऱ्या इतर महिलांच्या भावना दुखावणारं हे कुठलं पुरोगामीत्व आहे? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.आज वट पौर्णिमा आहे, दरवर्षी हा सण महिला मोठ्या भक्तीभावाने आणि आपल्या पतीबद्दलचे प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी साजरा करत असतात. सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते, अशी अख्यायिका या संदर्भात सांगितली जाते.

आपल्या पतीच्या आयुष्याचा धागा अधिक बळकट व्हावा, सात जन्म हाच पती मिळावा, या भावनेतून वट पौर्णिमा साजरी केली जाते. वडाला धागा बांधून प्रदक्षिणा घालण्याची ही परंपरा गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. आज या निमित्ताने रुपाली चाकणकर यांनी भाष्य केले, त्याला आमदार मेघना बोर्डीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. या ट्विटवाॅरची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT