Guardian Minister Gadakh Sarkarnama
मराठवाडा

तुमचे मंत्री भ्रष्टाचारी, बलात्कारी; भाजपचा पालकमंत्री गडाख यांच्यासमोरच गोंधळ

(Osmanabad Guardian Minister Tour) खासदार राजेनिंबाळकर यांनी संबंधित कार्यकर्त्याला 'ए जास्त बोलू नको' असे म्हणत खडसावले आणि ते गाडीत बसून निघून गेले.

सरकारनामा ब्यूरो

उस्मानाबाद ः पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यात चांगलाच गोंधळ झाला. कळंब तालुक्यातील बाहुला गावातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाहणी करण्यासाठी ते आले असतांना अतिवृष्टी व पूरग्रस्तांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांना केलेली मदत बॅंक खाती तपासून बघा, तुमचे मंत्री मात्र बलात्कार, भ्रष्टाचारातच गुरफटले आहे, अशी टीकाही या कार्यकर्त्यांनी केली.

जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची नाराजी व्यक्त करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आले होते. पण पालमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही, असा आरोप भाजपने केला. भाजपच्या कार्यकर्त्यानी सोबत आललेली सोयाबीनची पेंढी देखील पालकमंत्र्यांनी पाहिली नाही.

यावेळी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु निंबाळकर आणि भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक व वादावादी झाली. नुकसानीच्या मदतीचे सांगू नको, सोयाबीनचे भाव किती कमी झाले ते पहा, असे म्हणत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपवरच निशाणा साधला.

भाजपाकडूनही ओमराजे निंबाळकर आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. मागील पाच वर्षातील शेतकऱ्यांची बँक खाती तपासा, देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना भरघोस मदत केली. तुमचे मंत्री मात्र बलात्कार, भ्रष्टाचारातच अडकले, असा आरोप भाजपने केला.

यावर संतापलेल्या खासदार राजेनिंबाळकर यांनी संबंधित कार्यकर्त्याला 'ए जास्त बोलू नको' असे म्हणत खडसावले आणि ते गाडीत बसून निघून गेले. त्यामुळे पालकमंत्री गडाख यांचा जिल्हा दौरा पुन्हा एकदा वादात सापडला. या आधीच्या दौऱ्यात देखील भाजपने पालकमंत्र्यांचा ताफा अडवत संताप व्यक्त केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT