Yuva sangharsh yatra  Sarkarnama
मराठवाडा

Yuva sangharsh yatra News : हिंदू-मुस्लिम पॅटर्न यशस्वी होत नसल्याने मराठा-ओबीसी संघर्ष पेटवला जातोय..

Prasad Shivaji Joshi

Parbhani NCP News : देशात हिंदू-मुस्लीम संघर्ष निर्माण करून राजकीय फायदा उठविण्याचा पॅटर्न यशस्वी होत नसल्याने सत्ताधारी आता मराठा ओबीसी संघर्ष पेटवत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला आहे. (Yuva sangharsh yatra News) युवा संघर्ष यात्रा आज परभणी जिल्ह्यात दाखल आली. जिंतूर येथे पत्रकारांशी बोलतांना रोहित पवार यांनी राज्यातील सद्यस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट केली.

बीड मध्ये सहा तास पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. (NCP) कोल्हापूर, नगर, अमरावती येथे त्यांनी हिंदू- मुस्लीम करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा सत्ताधाऱ्यांना कळाले की जो पॅटर्न कर्नाटकमध्ये लागू केला, तो चालला नाही. (Parbhani) महाराष्ट्रातही तो चालणार नाही, हिंदू- मुस्लीम होत नसेल तर मग मराठा-ओबीसी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बीडमध्ये मराठा तसेच ओबीसी समाजाची घरे, दुकाने फोडण्यात आली. पोलिसानी सहा तास कुठलीही कारवाई केली नाही. पेट्रोल बॉम्बचा वापर करणाऱ्याना कोणी पुढे केले. पोलिस का काम करत नव्हते ? कारण राज्यात सत्तेत असलेले भाजप व अन्य पक्ष मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करत होते. विशेषत: लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील समतेचे वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न होत आहेत, असा आरोपही (Rohit Pawar) रोहित पवार यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य शासन गोंधळलेले असून घाईगडबडीत शासन निर्णय काढले जात आहेत. राज्यात गंभीर स्थिती असताना मंत्री, पालकमंत्री जनतेत जाऊन समस्या समजून घेण्याऐवजी केवळ फाईलवर सह्या करण्यात व्यस्त आहेत. मंत्र्यांचे ओएसडी ठराविक फाईल मोठमोठ्या हॉटेलमध्ये नेतात. ओएसडींनी सही केल्यानंतरच मंत्री सही करतात, असा दावाही पवार यांनी केला.

मंत्री छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत. कार्यकर्त्यांपासून ते थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली. पूर्वी त्यांच्या भाषणातून फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार व्यक्त व्हायचे. सध्या मात्र त्यांचे भाषण समरसतेचे असते. कारण भाजपला समता मान्य नसून समरसता मान्य आहे. त्यामुळे भूजबळ यांचे भाषण हे त्यांचे नसून देवेंद्र फडणवीस यांचे असल्यासारखे वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.

शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी असून ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्या पाठीशी हे तिन्ही पक्ष सर्व शक्तीनिशी उभे राहतील. महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT