Mumbai MHADA Lottery 2024 Sarkarnama
महाराष्ट्र

Mumbai MHADA Lottery 2024 : कोणत्या आमदार-खासदारांचे उत्पन्न अल्प, अत्यल्प? म्हाडामधील घरांसाठी कोण करणार अर्ज?

MHADA Mumbai Mandal : म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2 हजार 30 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. या अल्प आणि अत्यल्प उत्पन्न असलेल्या आमदार-खासदारांना घरे राखीव आहेत.

Pradeep Pendhare

Mumbai News : म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2 हजार 30 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. मुंबईत हक्काचे घर मिळवण्यासाठी सर्वसामान्यांची धावपळ उडाली असताना, यात खासदार-आमदार देखील घर मिळण्यासाठी धडपडत आहेत.

महागड्या आलिशान वाहनांमध्ये फिरणारे राज्यातील आजी-माजी आमदार-खासदार म्हाडाच्या लेखी अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटात मोडत असल्याचे समोर आले आहे. आमदार-खासदारांसाठी 32 घरे राखीव ठेवण्यात आली असून, त्यात 15 घरे अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील आमदार-खासदारांना ठेवल्याचे समार आले आहेत.

सर्वसामान्यांची घरे पूर्ण करण्यासाठी म्हाडा मुंबई मंडळाने 2 हजार 30 घरांची लॉटरी काढली आहे. त्यात वेगवेगळ्या गटांसाठी घरे ठेवली आहे. त्यानुसार आजी-माजी आमदार-खासदारांना 32 घरे राखवी ठेवली आहेत. या 32 मध्ये 15 घरे अल्प आणि अत्यल्प गटांमधील आमदार-खासदारांनी राखीव ठेवली आहे. म्हाडाच्या या गटामुळे अल्प आणि अत्यल्प गटांत कोणता आमदार-खासदार येतो, याची उत्सुकता लागली आहे.

अत्यल्प गटातील आमदार-खासदारांचे वार्षिक उत्पन्न 6 लाखापर्यंत, तर अल्प गटातील आमदार-खासदारांचे उत्पन्न 9 लाख रुपयापर्यंत हवे. उत्पन्नानुसार या गटात आमदार-खासदार यांना अर्ज करता येणार आहे. मात्र एवढे कमी वार्षिक उत्पन्न असलेले आमदार-खासदार आहेत, तरी कोण याची चर्चा असून, कोण अर्ज करतो, याकडे देखील लक्ष आहे. आमदार-खासदारांसाठी राखीव असलेली घरे अँटॉप हिल, वडाळा, मालाड, सांताक्रूझ, कुर्ला आणि कन्नमवारनगर येथे आहेत.

ऑनलाइन फसवणूक (Online fraud) करण्यासाठी म्हाडा मुंबई मंडळाचे बनावट संकेतस्थळ काहींनी सुरू केले. त्यामुळे म्हाडा मुंबई मंडळ अर्ज प्रक्रियेबाबत कडक भूमिकेत आहे. बनावट संकेतस्थळप्रकरणी मुंबई सायबर पोलिसाकडे तक्रार दिली आहे. मात्र ऑनलाइन अर्ज करण्याची म्हाडाची एक सिस्टम आहे. आवश्यक कागदपत्र ही डीजी लॉकरमधून सादर करावयची आहे. मात्र अनेकांकडे डीजी लॉकर ही सिस्टम नाही. त्यामुळे अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. कागदपत्र असूनही अर्ज करता येत नसल्याच्या तक्रारी आहेत. म्हाडाने डीजी लॉकर पद्धत ही पारदर्शकता आणण्यासाठी ठेवली आहे. डीजी लॉकरपद्धतीची अडचण येत असल्याने जुन्या पद्धतीने अर्ज भरण्याची मुभा मिळावी, अशी मागणी होत आहे.

बनावट संकेतस्थळापासून सावधान

म्हाडाच्या मुंबई मंडळाने घरांच्या सोडतीचे बनावट संकेतस्थळ तयार करून अर्जदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. मुंबई मंडळाच्या सोडतीची इत्थंभूत माहिती या बनावट संकेतस्थळावर देण्यात आली होती. अर्जाची अनामत रक्कम या संकेतस्थळावरून अदा करून घेतले जात होते. प्रति अर्जदाराकडून 50 हजार रुपये या बनावट संकेतस्थळावर भरून घेण्यात आले आहेत. तशा काहींच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या बनावट संकेतस्थळाची प्राधिकरणाने गंभीर दखल घेतली असून मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार करत गुन्हा नोंदविला आहे. म्हाडाच्या मुंबईत विविध ठिकाणच्या 2 हजार 30 घरांच्या सोडतीसाठी 9 ऑगस्टपासून अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT