Manikrao Kokate News : महायुती सरकारच्या काळात पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. या मुद्दावरून विरोधकांकडून सरकारला घेरले जात आहे. सरकारकडून एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीकविमा दिला जातो. त्यावरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
माणिकराव कोकाटे मीडियाशी बोलताना म्हणाले, 'भिकारीसुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही पण आम्ही एक रुपयात विमा आम्ही सरकार देतो. त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला. आणि अशा प्रकाराचे गैरप्रकार की बाहेरील राज्यातील लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्यामुळे अर्ज खूपच फोफावले. पीक योजना यशस्वी झाली पाहिजे तिचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. तिचा गैरफायदा घेण्यात येऊ नये.'
पीकविमा योजनेचा लोकांनी गैरउपयोग केला. योजनेचे चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहे. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लुटमार करतात. आम्हाला योजना बंद करायची नाही पण यात सुधारण्याची आवश्यकता आहे. काय सुधारणा करायच्या हे मुख्यमंत्र्यांशी बोलून ठरवू, असे कोकाटे म्हणाले.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भिकारीसुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही पण आम्ही एक रुपयात विमा शेतकऱ्यांना दिला, या वक्तव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, हे मस्तावलेले लोक आहेत. साम, दाम, दंड, भेद तसेच ईव्हीएममुळे हे लोक निवडणून आले आहेत. जर शेतकऱ्यांना नेते असे बोलत असतील तर त्यांनी आत्मपरीक्षण करावे की आपण कोण आहोत. माननीय अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांनी समज द्यावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.