flood damage inspection sarkarnama
महाराष्ट्र

Flood Damage : ओल्या दुष्काळाने शेतकरी कोलमडला, मंत्र्याचा मात्र पर्यटन दौरा? पक्षाला सहा तास अन् नुकसान पाहणीला अवघा...

Rohit Pawar Sanjay Shirsat : पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना मंत्री नुकसान पाहणी करण्यापेक्षा पक्षाच्या कामात दौऱ्यात व्यग्र असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Roshan More

Sanjay Shirsat News : मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक पाण्यात गेले. घरं कोसळली आहेत. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून मागणी करण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री, उपमु्ख्यमंत्र्यांसह मंत्रांनी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी दौरे सुरू केले आहेत.

मंत्र्याचे नुकसान पाहणी दौरा आहे की पर्यटन? असा संतप्त सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे. मंत्री संजय शिरसाट यांचा बुधवार (ता.24) सोलापूर जिल्हा दौरा जाहीर झाला आहे. या दौऱ्यात अतिवृष्टीच्या पाहणीसाठी 1 तास आणि पक्ष संघटनेसाठी 6 तास राखीव आहेत. म्हणजे शिरसाठसाहेब पक्ष संघटनेच्या बैठकीतून केवळ पाय मोकळा करण्यासाठी येणार आहेत का? ही शेतकऱ्यांची थट्टा नाही तर काय आहे? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

'हे मंत्री शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार आहेत की त्याच्या जखमेवर मीठ चोळणार आहेत? अशा ‘पर्यटन’ मंत्र्यांच्या दौऱ्यांची शेतकऱ्यांना कदापि गरज नाही. अशा फालतू दौऱ्यापेक्षा सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

असा असेल मंत्री शिरसाट यांचा दौरा

सकाळी आठ वा - मुंबई निवास्थाकडून करमाळाकडे(जि.सोलापूर) रवाना

दुपारी 12 : करमाळा येथे आगमन व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहाणी

दुपारी 1 : कुलस्वामीनी ग्रामदैवत कमलाभवानी मंदिर येथे पूजा, दर्शन (स्थळ श्री देवाचीमाळ ग्रामपंचायत)

दुपार 1.30 : शिवसेनेचे माजी आमदार जयंतराव जगताप यांच्या निवास्थानी भेट

दुपारी 2 : तुळशी वृंदावन सदिच्छा भेट ( महेश चिवटे यांच्या निवास्थानासमोर, देवीचामाळ रस्ता)

दुपारी 2.10 : मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे डायलिसिस सेंटर, ब्लॅड बँक सदिच्छा भेट

दुपारी 2.30 : पै. पंजाबराव वस्ताद शिवसेना शाखा उद्घाटन

दुपारी 2.45 : राशिन रोड, कंटेनर शिवसेना शाखा उद्घाटन

दुपारी 3.30 : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन

दुपारी 4. शेतकरी आणि शिवसैनिक भव्य मेळावा

सायंकाळी 7 : शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT