Maharashtra Teacher  Sarkarnama
महाराष्ट्र

Teacher News: अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मोठा दिलासा! शिक्षक-शिक्षकेतर नियुक्त्यांना महिनाभरात मंजुरी

Teacher Recruitment in Minority Education Institutions: अल्पसंख्याक संस्थांमधील शिक्षकांच्या वेतनातील विलंब, प्रलंबित नियुक्त्या आणि अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नाबाबत शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता.

Mangesh Mahale

Maharashtra Education News:महाराष्ट्रातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सरकारने गुड न्यूज दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित नियुक्ती प्रस्तावांना महिनाभराच्या आत मंजुरी देण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.

अल्पसंख्याक संस्थांमधील शिक्षकांच्या वेतनातील विलंब, प्रलंबित नियुक्त्या आणि अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नाबाबत शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

या आदेशामुळे महाराष्ट्रातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित नियुक्ती प्रस्तावांना अखेर गती मिळणार आहे.

संबंधित विभागाने अशा सर्व प्रलंबित नियुक्ती प्रस्तावांवर एका महिन्याच्या आत निर्णय घेऊन मंजुरी द्यावी, असे आदेश देण्यात आल्याची माहिती डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.

मनुष्यबळाची कमतरता

सध्या सुरु असलेल्या धोरणानुसार ८० टक्के रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित २० टक्के पदांसाठी वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे संस्थांमधील मनुष्यबळाची कमतरता दूर होऊन शैक्षणिक कामकाज अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.

वेतन वेळेवर

याशिवाय, पोर्टलवरील अतिरिक्त शिक्षकांच्या समस्येचा आढावाही सरकार घेत असून, संबंधित शिक्षकांना अतिरिक्त घोषित न करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असेही भोयर यांनी सांगितले. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळावे यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजनाही करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावांना लवकर मंजुरी

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे डॉ. भोयर यांनी नमूद केले. आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीने करून प्रलंबित नियुक्ती प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्याची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT