Jayant Patil Mahendra Dalvi
Jayant Patil Mahendra Dalvi  sarkarnama
महाराष्ट्र

जयंत पाटील म्हणतात, 'शिवसेनेच्या आमदारांची छाप पडत नाही'

सरकारनामा ब्युरो

-राजेश भोस्तेकर

अलिबाग : ''अलिबागच्या आमदारांची छाप पडत नसल्याने आमची आठवण मंत्री, अधिकारी शिपाई काढतात,'' अशी शेलक्या शब्दात अलिबाग मुरुड विधानसभेचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi) याच्यांवर शेकापचे आमदार जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांनी टीका केली आहे. ते अलिबाग येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. त्यांच्या या विधानामुळं आमदार दळवी व त्यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अलिबाग विधानसभा मतदारसंघातून अनेक दिग्गजांनी प्रतिनिधित्व करून सभागृह गाजविले आहे. अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi) याची विधानसभा सभागृहात छाप पडत नसल्याची नाराजी जयंत पाटलांनी (MLA Jayant Patil) आपल्या भाषणातून व्यक्त केली. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी याच्या कामकाजाबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित करून टोला लगावला. ''विधानसभा सभागृहात मंत्री, आमदार याचे मूल्यमापन हे तेथील शिपाई करीत असतो. मात्र आपल्या अलिबागच्या आमदारांची छाप पडत नसल्याने आमची आठवण मंत्री, अधिकारी शिपाई काढतात ,''अशी शेलक्या शब्दात आमदार दळवी याच्यावर जयंत पाटील यांनी टीका केली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांत संघर्ष पेटण्याची शक्यता या टिकेमुळे निर्माण झाली आहे.

आगामी अलिबाग नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काल अलिबाग भाग्यलक्ष्मी सभागृहात आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग नगरपरिषद हद्दीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, राजीप सदस्य ऍड आस्वाद पाटील, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या भाषणावेळी त्यांनी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी याच्यावर विधानसभा सभागृहातील कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT