Eknath Shinde, Sanjay Gaikwad  Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad Investigation : एकनाथ शिंदेंच्या आमदाराला न्यायालयाचा झटका; चौकशीला परवानगी, अडचण वाढणार?

Kolhapur Court Police : शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणे आमदार संजय गायकवाड यांना महागात पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या चौकशीसाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे.

Roshan More

Sanjay Gaikwad News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाश प्रशांत आंबी यांना गायकवाड यांनी फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती.

या प्रकरणी प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गायकवाड यांच्या चौकशीसाठी जिल्हा न्यायालयात परवानगी मागितली होती. न्यायालयाने गायकवाड यांच्या चौकशीसाठी परवानगी आता दिली आहे.

शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी का केला, असा सवाल करत आमदार गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या प्रकरण गायकवाड यांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध करण्यात आला होता.

हे प्रकरण अंगलट येत असताना गायकवाड यांनी दिलगीरी व्यक्त करताना म्हटले होते की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जगणारे आणि मरणारे आम्ही लोक आहोत. म्हणून पदोपदी त्यांचा आपमान आम्ही सहन करणार नाही.माझा या पुस्तकाबद्दल काही आक्षेप नाही, पण ज्यानं कोणी ते पुस्तक प्रकाशित केलं आहे, त्यानं फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर करावा"

फोन सुरूच

गायकवाड यांच्या धमकीनंतर प्रकाशक आंबी यांनी बुलढाण्यात मोर्चा काढून निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत कारवाई केली होती. दरम्यान, गायकवाड यांचे समर्थक अजुनही आंबी यांना फोन करत धमकी देत असल्याचे समोर आले आहे. महिन्याभरात शंभरहून अधिक त्यांना धमक्यांचे फोन आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT