Maharashtra Vidhan Parishad Winner Candidate List 2026 Sararnama
महाराष्ट्र

MLC Winners List : शिक्षक, पदवीधरमधून कोण विजयी, वाचा संपूर्ण यादी! नागपूरमध्ये ट्विस्ट

Teachers Graduates Mlc Election Results : महायुतीने दोन तर महाविकास आघाडीचा तीन जागांवर विजय झाला आहे. नागपूरच्या निकालामत मोठा ट्विस्ट आला. आघाडीवर असलेले भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे हे दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीनंतर पराभूत झाले

Roshan More

MLC Winners : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये महायुतीने दोन आणि महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचे कौस्तुभ गावडे हे विजयी झाले आहेत. तर, पुणे पदवीधरमधून हर्षदा देशमुख-जाधव या विजयी झाल्या आहेत. अमरावतीमधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी झाले आहेत.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून तीन वेळेचे आमदार सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांनी पराभूत करत विजय मिळवला आहे. तर, नागपूरमध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत.

विजय उमेदवार - पराभूत उमेदवार - मतदारसंघ

कौस्तुभ गावडे - सचिन सानप -पुणे शिक्षक

हर्षद जाधव-देशमुख - स्मिता पाटील-जाधव - पुणे पदवीधर

किरण सरनाईक - आदिती पोहरे - अमरावती शिक्षक

प्रतापसिंह पाटील - सतीश चव्हाण - औरंगाबाद पदवीधर

अभिजीत वंजारी - सुधाकर कोहळे - नागपूर पदवीधर

नागपूरमध्ये मोठा ट्विस्ट

नागपूर पदवीधरमध्ये दुसऱ्या फेरीनंतर भाजपचे सुधाकर कोहळे हे आघाडीवर होते. त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला होता. मात्र, दुसऱ्या पसंतीचे मतमोजणीवेळी बाजी पलटली नितेश कराळे यांच्या मतपत्रिकेतील दुसऱ्या पसंतीची सर्वाधिक मते अभिजीत वंजारी यांना मिळाली. आणि त्यांनी कोहळे यांचा पराभव करत विजय संपादन केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT