Prakash Mahajan Sarkarnama
महाराष्ट्र

MNS News : मनसेच्या नेत्याचे लाडकी बहीण योजनेबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले, 'मुस्लिम समाजातील महिलांना लाभ देऊ नका'

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. योजना जाहीर करून चारच दिवस झाले असताना या योजनेला सर्वस्थरातून चांगला प्रतिसाद लाभत आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. त्यातच काही जणांकडून या योजनेबाबत मत-मतांतरे व्यक्त केली जात आहेत. त्यातच आता मनसेच्या (MNS) नेत्याने या योजनेबाबत वादग्रस्त विधान केले असून त्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मुस्लिम समाजात दोन पेक्षा जास्त मुले असलेल्या महिलांना देऊ नये, अशी मागणी केली आहे. त्यासोबतच मुस्लिम समाजात एकापेक्षा जास्त पत्नी असलेल्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, अशीदेखील मागणी केली आहे. महाजन यांनी केलेल्या वादग्रस्त विधान मागणीनंतर सर्वस्थरातून टीका केली जात आहे. त्यांनी केलेल्या मागणीला काही जणांनी उत्तरे दिली आहेत.

प्रकाश महाजन यांनी ज्या लोकांना दोन बायका आहेत, ज्या लोकांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत, त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये. ही योजना या मंडळींना देण्यात आली तर विवाहित महिलेला दोन अपत्यांची अट असावी आणि एक पती आणि एक पत्नी असलेल्याना या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांच्यावरही महाजन यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या हिंदू धर्माशी कसलाच संबंध नाही. त्यांनी आमच्या धर्मावर बोलू नये, असा घणाघात प्रकाश महाजन यांनी केला आहे.

दुसरीकडे प्रकाश महाजन यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश महाजन यांचं हे विधान म्हणजे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीचा पब्लिकसिटी स्टंट आहे. मुळामध्ये या योजनेचा बॅकग्राऊंड पाहता ही योजना 21 ते 60 वयोगटासाठी आमच्या सरकारने काढलेली आहे. शासन सर्व स्तरातील महिलांना लाभ देणार आहे. त्यामुळे महाजनसारख्या व्यक्तींची दखल घेणे गरजेचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT