Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या सभेत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांना चांगलेच लक्ष्य केले.
'उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर येण्यास तयार नाही, तर एकनाथ शिंदे यांची पुष्पा स्टाईलनं नक्कल केली आणि शरद पवारांचे आजचा देवधर्म हा खोटारडा आहे', असा घणाघात राज ठाकरेंनी केला.
राज्यातील मतदार संघाचा आढावा घेताना काय कोण कोणत्या गटात आहे, यातच वेळ गेला, हे सांगताना हे तुमचे होऊ शकले नाही, ते महाराष्ट्राचे काय होतील, असा सवाल राज ठाकरेंनी केला. निष्ठा नावाची गोष्ट आहे की नाही, महाराष्ट्रातील जनता यांना कसं काय मतदान करते? हे यांचे राहू शकले नाही, ते तुमचे काय राहणार आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुरवातीला टीका केली.
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर यायला तयार नाही. सारखं वाघ नखं बाहेर काढतंय. इथून अफजलखान आला, शाहिस्तखान आला, अफजाली आला, अरे महाराष्ट्राबद्दल बोल, असा टोला लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोलताना, त्यांची नक्कलच केली. तिकडं ते पुष्पा वेगळंच चालू आहे. मै आया.., असे म्हणत दाढीखालून पुष्पा स्टाईल हात फिरवत, मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नाही, असे खणखणीत टोला राज ठाकरेंनी लगावला.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नास्तिकपणावर राज ठाकरेंनी पुन्हा हल्ला चढवला. 'शरद पवार यांनी आजपर्यंत देवधर्म पाळले नाहीत. मी म्हटल्यांवर पवारसाहेब प्रत्येक मंदिरात जायला लागले. पण त्यांचे हात जोडणं देखील खोटं आहे. ते तुम्हाला दाखवण्यासाठी आहे. सावध राहा. खोटनाटं वाटेल, ते करतील, जातीमध्ये अडकवतील, पैशाचा महापूर आणतील. पण सावध राहा', असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
'विधानसभा निवडणुकीला पैसे वाटतील, पैशाचा पूर येईल नुसता. ते पैसे घ्या, नक्की घ्या. ते तुमचेच आहे. हे पैसे घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला विजय करा. मनसेची सत्ता आल्यावर महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही, तुटणार नाही. हे महाराष्ट्राला दाखवून देतो. महाराष्ट्राचा अभिमान कसा जपला जातो, हे दाखवून देईल', असे राज ठाकरेंनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.