Raj Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray News : राज ठाकरे महायुतीत सामील होणार?, चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्ली गाठली!

Raj Thackeray Delhi tour News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीत दाखल असून, राज ठाकरे दिल्लीला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Mayur Ratnaparkhe

MNS and Mahayuti News लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. चार दिवसांत राज ठाकरेंचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील दिल्लीतच आहेत. यामुळे राज ठाकरेंचा महायुतीत प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंबद्दल राजकीय वर्तुळातून ते महायुतीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार आज रात्री महायुतीची बैठक दिल्लीत होणार असून, त्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यापैकी एक जागा दक्षिण मुंबई मतदारसंघ असल्याचं बोललं जात आहे, तर मनसेला जरी दोन लोकसभेला जागा न दिल्यास एक जणांना राज्यसभेची उमेदवारी भाजपकडून(BJP) देण्याची शक्यता तसेच विधानसभेत पण समाधानकारक जागा देण्याचे सुद्धा आश्वासन भाजप देऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक असणार असल्याचं दिसत आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि आमची विचारधारा एकच आहे. मात्र, योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असे मुख्यमंत्री शिंदेंनी मनसेबाबत सूचक विधान केले. यामुळे आगामी काळात मनसे महायुतीचा भाग होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT