Raj Thackeray ,Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Video Raj thackeray : राज ठाकरे मराठा आरक्षणाच्या बाजूने की विरोधात? स्वतःच सांगितली भूमिका

Raj thackeray Maratha Reservation : राज ठाकरेंनी महाराष्ट्रात जातीय राजकारण करून तरुणांची माथी भडकवली जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर केला.तसेच अजित पवार जातीचे राजकारण करत नाही, असे देखील राज ठाकरे म्हणाले.

Roshan More

Raj thackeray News : 'महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही', असे राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. धाराशीवमध्ये ठाकेर मुक्कामी असलेल्या हाॅटेलमध्ये आंदोलक घुसले होते. तर, बीडमध्ये त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मराठा आरक्षणावर राज ठाकरेंची भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, 'आमची 2006 पासून भूमिका राहिली आहे. आरक्षण द्यायचे असेल तर ते आर्थिक निकषावर दिले पाहिजे.' राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून जातीवर आधारीत आरक्षण मान्य नसल्याचे दिसते.

राज ठाकरेंनी Raj thackeray महाराष्ट्रात जातीय राजकारण करून तरुणांची माथी भडकवली जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर केला. आपल्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामागे तसेच आपल्या दौऱ्याला विरोध हा मनोज जरांगे पाटील यांच्या आडून शरद पवार, उद्धव ठाकरे करत आहेत. मात्र, त्यांच्याकडे प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत. त्यांना महाराष्ट्रात एकही सभा घेऊन देणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

'ती' मतं मोदी-शहांच्या विरोधात

लोकसभेला Loksabha जे यश मिळाले त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना वाटते आहे की त्यांना मतं मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना वाटते की विधानसभेला देखील तीच खेळी खेळावी. मात्र ती मतं त्यांची नाहीत. ती मतं अमित शाह आणि नरेंद्र मोदींच्या विरोधातील आहेत. मुस्लिम मतं आणि दलित बांधवांची मतं ही लोकसभेला शाह-मोदी यांच्या विरोधात होती. संविधान बदल्याच्या भाजप नेत्याच्या वक्तव्याचा त्यांना फटका बसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

अजित पवारांचे कौतुक

राज ठाकरे म्हणाले की, शरद पवारांनी जातीचे राजकारण केले. अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत असताना देखील आणि आता त्यांच्यासोबत नसतानाही कधीही जातीचे राजकारण केले नाही. त्यांनी कधीही जातीपातीवर वक्तव केले नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवारांचे कौतुक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT