Raj Thackeray manoj Jarange Patil sarkarnama
महाराष्ट्र

Video Raj Thackeray : गचंडी धरू म्हणणाऱ्या मनोज जरांगेंना राज ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले, 'जातीचं राजकारण...'

MNS Raj Thackeray manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील हे गचंडी धरू जाब विचारणार म्हणत असल्याचे पत्रकरांनी राज ठाकरे यांना विचारले. त्यावर ठाकरे यांनी खरंच जरांगे पाटील असे म्हटले का? याची विचारणा पत्रकारांकडे केली.

Roshan More

Raj Thackeray News: 'मराठ्यांनी अडवायचे आणि जाब विचारायचे ठरवले, तर मुंबईत जाऊन गचंडीला धरून जाब विचारू शकतो, एवढी क्षमता मराठ्यांत आहे. मुंबईत मराठ्यांची किती ताकद आहे, हे दाखवून देऊ, असे मनोज जरांगे राज ठाकरे यांना उद्देशून म्हटले होते. त्यामुळे राज ठाकरे जरांगेंना काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता होती. राज ठाकरेंनी अवघ्या एका वाक्यात जरांगेंच्या वक्तव्यावर मत व्यक्त केले.

मनोज जरांगे पाटील हे गचंडी धरू जाब विचारणार म्हणत असल्याचे पत्रकरांनी राज ठाकरे यांना विचारले. त्यावर ठाकरे यांनी खरंच जरांगे पाटील असे म्हटले का? याची विचारणा पत्रकारांकडे केली. तसेच 'मी त्यांच्याशी भेटल्यावर बोलले', असे एका वाक्यात उत्तर देत हा प्रश्न उडवून लावला.

राज ठाकरे म्हणाले, बीडमध्ये माझ्यागाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या एकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. नशिब तेथे पोलिस होते. नांदेडमध्ये माझ्या विरोधात घोषणा दिल्या. ही माणसं जरांगे यांची नव्हती. ती शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या सोबतची माणसं होती.

आपण महापुरुष जातीत वाटून घ्यायचो का? असे कधीही नव्हते. याच्या मागून ज्यांना राजकारण करायचे तेच हे सगळं करत आहेत. या सगळ्यांच्या जातीची समीकरणे आहेत. तुमची जात तुम्हाला प्रिय असते. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष पसरवू नका. देशात जातीचे राजकारण नवे नाही. पण या प्रकराचे राजकारण कधी पाहिले नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

फडणवीस यांचा राग समाजावर का काढता?

लोकसभेला जे यश मिळालं. जी मतं मिळाली ती आपल्याला मिळाल्याचे शरद पवार, उद्धव ठाकरेंना वाटत आहे. मात्र ती मतं मोदी-शाह यांच्या विरोधातील होती. विधानसभेसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार मनोज जरांगे यांच्या आडून खेळ करत आहेत.

पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत विशेषतः मराठवाड्यात जेवढ्या दंगली घडवता येतील, असे प्रकार घडवता येतील, यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही राजकारण करताय ना तर त्या पद्धतीने तुम्ही बोला. समाजामध्ये कशाला भांडणे लावत आहात. देवेंद्र फडणवीस यांचा राग समाजावर का काढता, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT