Maharashtra Elections 2024 MNS Candidates: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप जवळपास फायनल झाले आहेत.
दुसरीकडे सर्वच पक्ष वेगाने उमेदवारांची घोषणा करीत आहेत. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये 32 उमेदवारांची घोषणा केली आहे.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली . मनसेकडून जाहीर करण्यात आलेल्या सहाव्या यादीत एकूण 32 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत पहिल्या यादीत दोन जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली तर दुसऱ्या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे होती, त्यानंतर तिसऱ्या यादीत 13, चौथ्या यादीत 5, पाचव्या यादीत 15, सहाव्या यादीत 32 असे एकूण आतापर्यंत 110 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
या यादीत नाशिक पूर्वमधून प्रसाद सानप यांना उमेदवारी जाहीर केली. देवळाली मतदारसंघातून मोहिनी जाधव, नाशिक मध्यमधून अंकुश पवार, जळगाव ग्रामीणमधून मुकुंदा रोटे, विलेपार्ले मतदारसंघातून जुईली शेंडे यांना उमेदवारी जाहीर केली. कल्याण पश्चिममधून उल्हास भोईर, उल्हासनगरमधून भगवान भालेराव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमावेळी आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत राजू पाटील आणि अविनाश जाधव यांचंदेखील नाव होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.