Akola : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली आहे. अकोल्यातील विश्रामगृहात ते थांबलेले असताना आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरी यांच्या गाडीवर दगड मारले व कुंड्या फेकल्या. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ठाकरे यांना सुपारीबाज म्हटल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर अकोल्यात मंगळवारी ही घटना घडली आहे.
दरम्यान, मिटकरी यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करत आहे. शासकीय विश्रामगृहात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी याठिकाणी आलो होतो. माझे विधान मागे घेण्याचा प्रश्नच नाही. मी धमक्यांना भीक घालत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी पुण्यात अजित पवारांवर टीका केली होती. त्यावर पलटवार करताना मिटकरी यांनी ठाकरेंचा सुपारीबाज असा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की, दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण, हे सुपारीबहाद्दर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कोणतं आंदोलन असेल ते जीवनात कधीच यशस्वी करू शकले नाहीत.
विश्वासाहर्ता या व्यक्तीची संपलेली आहे. राजकारणात, महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.