Narendra Modi Shjivaji Maharaj .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Modi Government News : मोदी सरकारची शिवजयंतीनिमित्त मोठी घोषणा; राज्य सरकारला धाडलं पत्र

Narendra Modi Government On Shivjayanti : केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला शुक्रवारी(ता.14) पत्र पाठवण्यात आलं आहे.छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त केंद्रानं राज्य सरकारला काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

Deepak Kulkarni

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पुतळा अवघ्या आठ महिन्यांतच कोसळल्यानं तीव्र संतापाची लाट उसळली होती.यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही तापलं होतं.

पण आता पुन्हा एकदा पुतळा उभारणीचं काम वेगानं सुरू आहे. यावेळी पुतळा निर्मितीच्या कामात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे. अशातच आता केंद्र सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीनिमित्त महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला शुक्रवारी(ता.14) पत्र पाठवण्यात आलं आहे.छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त केंद्रानं राज्य सरकारला काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.या पत्रात केंद्रानं राज्याला शिवजयंतीचं औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ‘जय शिवाजी जय भारत‘ पद यात्रा काढण्याचे आदेश दिले आहेत.

विशेष बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 19 फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता या पदयात्रेचं स्वतः ऑनलाईन पध्दतीनं उद्घाटन करणार आहेत. PM मोदींच्या हस्ते उद्घाटन आणि मार्गदर्शन झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 8.30 वाजता पदयात्रा सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्र सरकारच्या उपक्रमामागं मोठा उद्देश असून यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराजांचं आरमार,युध्द कौशल्य,राजनीती, पराक्रम,कर्तबगारी आणि आदर्श राज्य कारभार जनतेपर्यंत पोहचवण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचं सरकारकडून यावेळी माहिती देण्यात आली आहे.

केंद्रानं पाठवलेल्या पत्रात केलेल्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यांत 6 किलोमीटरची ही पदयात्रा काढण्याचे सांगण्यात आलं आहे. या पदयात्रेमध्ये राज्य सरकारमधील मंत्री,खासदार-आमदार ,प्रशासकीय अधिकारी,विद्यार्थी आणि तरुणांचा उल्लेखनीय सहभाग राहणार आहे. तसेच मोदी सरकारमधील केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय हे शिवजयंतीनिमित्तच्या कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये होत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं शिवजयंतीच्या दिवशी पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसरा टप्पा देखील भव्य असा निर्माण करण्यात आला आहे. तसेच एकूण 21 एकरवर होत असलेल्या या शिवसृष्टीचं तिसरा व चौथ्या टप्प्याचं कामही वेगानं सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT