ज्या भागात पाइपद्वारे PNG सुविधा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या आदेशानुसार, संबंधित भागात PNG उपलब्ध असूनही जर घरांनी ते कनेक्शन घेतले नाही, तर त्यांचा LPG गॅस पुरवठा बंद केला जाणार आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 24 मार्च रोजी हा आदेश जारी केला असून, नागरिकांना PNG कनेक्शन घेण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे. संबंधित अधिकृत कंपनीकडून सूचना मिळाल्यानंतर या कालावधीत PNG स्वीकारणे आवश्यक असेल. अन्यथा, दिलेल्या मुदतीनंतर त्या घराचा LPG पुरवठा थांबवला जाईल.
सध्या पश्चिम आशियातील युद्धस्थितीमुळे LPG गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशात गॅस तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने PNG कडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. PNG हा पाइपलाइनद्वारे थेट घरापर्यंत पोहोचवला जातो, त्यामुळे सिलिंडर भरण्याची गरज राहत नाही.
या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, ज्या घरांना PNG उपलब्ध आहे, त्यांनी ते स्वीकारणे बंधनकारक असेल. मात्र, तांत्रिक कारणांमुळे PNG जोडणी देणे शक्य नसल्यास, संबंधित पुरवठादाराकडून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ मिळाल्यानंतरच LPG सेवा सुरू ठेवता येईल.
सरकारने या निर्णयासोबतच पाइपलाइन प्रकल्पांना गती देण्यासाठीही काही नियम निश्चित केले आहेत. पाइपलाइन टाकण्यासाठी आवश्यक परवानग्या ठराविक कालावधीत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, गृहनिर्माण सोसायट्यांनी 3 कामकाजाच्या दिवसांत प्रवेश द्यावा लागेल, आणि अंतिम PNG जोडणी 48 तासांत देणे अपेक्षित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.