Narendra Modi Sarkarnama
महाराष्ट्र

PM Modi Speech In Pune: मोदींच्या पुण्यातील भाषणाची सुरवात मराठीतून, टिळक पुरस्काराची रक्कम दिली गंगा नदी स्वच्छतेला

Pune VIP Visit Today: लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आहे, तशी अण्णाभाऊ साठे यांची जयंतीही आहे, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

सरकारनामा ब्युरो

Pimpri News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासह इतर विकासकामांची उदघाटने, भुमीपूजनासाठी आज सकाळी पुण्यात आले होते. (PM Visit In Pune News) दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी टिळक पुरस्कार स्वीकारला. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात मराठीतून केली. नंतर मध्येही ते काही ओळी मराठीत बोलले.

दरम्यान, टिळक पुरस्काराची रक्कम त्यांनी नमामी गंगे या गंगा स्वच्छतेच्या मोहिमेसाठी दिली. तसेच हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित केला. (Narendra Modi) आजचा दिवस जेवढा महत्वाचा तेवढाच भावूक असल्याचे ते आपल्या मनोगतात म्हणाले. दरम्यान, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी शरद पवार, (Sharad Pawar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भाषणे एकदम आटोपशीर अशी केली.

लोकमान्य टिळकांची आज पुण्यतिथी आहे, तशी अण्णाभाऊ साठे यांची जयंतीही आहे, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. (Pune) अण्णाभाऊंचे सामाजिक सुधारणेतील योगदान असामान्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे आपले आदर्श असल्याचा उल्लेख केला.

लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्याच्या माथ्याचे टिळा (तिलक) असल्याचे प्रशंसोद्गार मोदींनी यावेळी काढले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धरतीवरील हा सन्मान माझ्या जीवनातला अविस्मरणीय अनुभव आहे,असे त्यांनी सांगितले. टिळकांच्या कुटुंबाचा हा पुरस्कार मिळणे हे सौभाग्य असल्याने मी आभारी आहे,अशी कृतज्ञतेची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

विद्येची भूमी पुण्यातील हा सन्मान मिळणे यापेक्षा मोठा गौरव कुठला, असे ते म्हणाले. मात्र, त्यामुळे जबाबदारी वाढल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांच्याप्रती कर्तव्यात कमी पडणार नाही,असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT