Girl suicide News : बीड जिल्ह्यात एकामागून एक गुन्हेगारी घटनासमोर येत आहेत. तब्बल एका महिन्यापूर्वी आत्महत्या केलेल्या तरुणीसाठी न्याय मागणारे पत्र आता समोर आले आहे. आत्महत्या केलेल्या मुलीच्या आईनेच हे पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिले आहे. ब्लॅकमेलिंग आणि छेडछाडीला कंटाळून साक्षी कांबळे हिने 14 मार्चला आपल्या मामाच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. तब्बल एका महिन्यानंतरही कांबळे कुटुंबीय न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
आपल्याला न्याय मिळावा यासाठी साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पत्राच्या सुरुवातीलाच त्यांनी म्हटले आहे की, साहेब मी तुमची लाडकी बहीण. आपण मुख्यमंत्री असताना आमच्या सारख्या बहिणींना भावाचा बंध मिळाला. आपण मुख्यमंत्री आहात मात्र आमच्यासाठी तुम्हीच मुख्यमंत्री आहात. तुमच्या भाचीने आपले जीवन संपले.
माझी मुलगी साक्षी हिला हवाई सुंदरी व्हायचे होते मात्र तिने आपले जीवन संपवले. साहेब, काही मुलांनी तिची छेड काढली आणि तुमच्या लाडक्या बहिणीच्या लेकीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. साक्षी परत या जगात येणार नाही. तुमची भाचीला न्याय मिळाला पाहिजे. त्या क्रुर नराधमांना शिक्षा व्हायला हवी त्यांच्यावर मकोका लावायला हवा. ते तुरुंगातून बाहेर यायला नको, असे पत्रात म्हटले आहे.
पत्रात म्हटले आहे की, धाराशिव सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता. पोलिस अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले आहे. त्यांनी कसलाही जबाब आमचा घेतला नाही. उपअधिक्षकांनी आम्हाला अपमानित केले कित्येक तास कार्यालयाबाहेर बसवून ठेवलं. आरोपीची बहिण पोलिस दलात असल्याने आम्हाला न्याय मिळत नाही.
साक्षी हिच्या आईने आरोप केला आहे की, आरोपी अभिषेक कदम आणि 10 जणांची टोळी आहे ती मुलींना फसवते. त्यांचे फोटो काढते त्यांना ब्लॅकमेलिंग करते यामध्ये त्यांना दोन मुलींची देखील साथ आहे. साक्षीच्या आईने हेही सांगितले की 20 एप्रिलला साक्षीचे लग्न होणार होते मात्र त्यापूर्वीच तिने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.