Devendra Fadnavis,Sanjay Raut  sarkarnama
महाराष्ट्र

युतीला पूर्णविराम ; महाआघाडी हेच महाराष्ट्राचे राजकीय भविष्य!

शिवसेना-भाजपची (Shiv Sena BJP alliance) युती कुणामुळे तुटली, शिवसेना-भाजपचे संबध का बिघडले यावर राऊतांनी आज 'रोखठोक' उत्तर दिले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची (Shiv Sena) महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे व भारतीय जनता पक्षाशी 'टेबलाखालून' व्यवहार आणि बोलणी चालली आहेत, हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येतील या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे,'' असे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज स्पष्ट केलं.

शिवसेना-भाजपची (Shiv Sena BJP alliance) युती कुणामुळे तुटली, शिवसेना-भाजपचे संबध का बिघडले यावर राऊतांनी आज 'रोखठोक' उत्तर दिले आहे.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस,पूनम महाजन यांच्यावर राऊतांनी जोरदार हल्ला केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना हिंदुत्वावरुन खडे बोल सुनावले होते. त्यानंतर राऊतांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांची कानउघाडणी केली आहे.

संजय राऊत 'रोखठोक'मध्ये म्हणतात..

उद्धव ठाकरेंच्या भाषणातून एक संदेश नक्की मिळाला तो म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे व भारतीय जनता पक्षाशी 'टेबलाखालून' व्यवहार आणि बोलणी चालली आहेत, हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येतील या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे. 23 जानेवारीच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला केला. भाजपच्या ढोंगाचे, नकली हिंदुत्वाचे इतके वाभाडे ठाकरे यांनी कधीच काढले नव्हते.

इतका जळफळाट कशासाठी?

भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीत शिवसेनेची वाढ झाली नाही. युतीत आम्ही सडलो, असे विधान त्यांनी पुन्हा केले. यावरून दोन पक्षांत आता टोकाचे भांडण सुरू झाले. महाराष्ट्रात कोण कोणाच्या आधाराने आणि मदतीने वाढले याचे संदर्भ देण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात जोर होता व त्यांच्या भाषणाने भाजपास मिरच्या झोंबल्या हे त्यामुळे नक्की झाले. देवेंद फडणवीसांपासून आशिष शेलार यांच्यापर्यंत सगळे नेते शिवसेनेवर तुटून पडले. हा इतका जळफळाट कशासाठी?

संयुक्त महाराष्ट्रास अपशकून

कोण कोणाच्या आधी जन्मास आले यापेक्षा जन्मास येऊन काय दिवे लावले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मूळ जनसंघ 1978 साली जनता पक्षात विलीन झाला. त्यानंतर जनता पक्ष फुटला. जनसंघाने नाव बदलून भारतीय जनता पक्षाचे रूप धारण केले, पण जनसंघ तरी भारतीय राजकारणात फार गाजत वाजत होता असे नाही. संयुक्त महाराष्ट्र लढय़ातही जनसंघ दिसला नाही व तिकीट वाटपाचा मुद्दा घेऊन जनसंघ समितीतून बाहेर पडला व संयुक्त महाराष्ट्रास अपशकून केला. हा इतिहास आहे.

गडकरी हे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते

जनसंघाची पणती महाराष्ट्रात कधी पेटलीच नाही हे खरे. पण जनसंघात काही तत्त्वाची व नीतिमत्ता असलेली माणसे होती. महाराष्ट्राच्या सीमा लढ्यातही जनसंघ कधीच हिरीरीने उतरला नाही. भारतीय जनता पक्षाचीही तीच भूमिका आहे. बेळगावातील निवडणुकीत फडणवीस प्रचारासाठी जातात व महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव करा असे सांगतात. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, खडसे हे भाजपचे नेते अशा पद्धतीने वागताना दिसले नाहीत. नितीन गडकरी हे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते आहेत, पण सीमा भागात जाऊन त्यांनी मराठी संघटनांविरुद्ध प्रचार केला नाही हे सत्यच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT