MPSC Protest Raj Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

MPSC Protest : 'एमपीएससी' विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा यश मिळणार, राज ठाकरेंनी दिली 'गूड न्यूज', म्हणाले, 'मुख्यमंत्री...'

Raj Thackeray Devendra Fadnavis : राज ठाकरे यांचे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

Roshan More

Raj Thackeray News : एमपीएससीचे विद्यार्थी हे आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्यातील एस एम जोशी पूल परिसरात आंदोलन करत आहे. या आंदोलनाला ५ ऑक्टोबरला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट देत मार्गदर्शन केले होते. आता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यार्थ्यांना गूड न्यूज दिली आहे.

राज ठाकरे म्हणाले,मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राहणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते.

म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा, असे आवाहन देखील ठाकरेंनी केले आहे.

तीन विद्यार्थ्यांनी उपोषण सोडले

गुरुवारी मध्यरात्री उपोषण करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सोडले. ऋषिकेश गांगर्डे, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके असे उपोषण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. उपोषण सोडण्यामागचे कारण हे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, चार विद्यार्थ्यांचे उपोषण अद्यापही सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT