BMC Bulldozer Action On Dawood Ibrahim father Ibrahim Kaskar house Sarkarnama
महाराष्ट्र

Dawood Ibrahim : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित इमारतीवर BMC ची बुलडोझर कारवाई; मशिदही पाडली जाणार

BMC Bulldozer Action On Dawood Ibrahim Linked Building : मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील दाऊद इब्राहिमशी संबंधित जुन्या आणि धोकादायक इमारतीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) बुलडोझर फिरवत कारवाई सुरू केली आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : मुंबईतील भेंडी बाजार परिसरात महानगरपालिकेकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित इमारतीवर BMC चा बुलडोझर चालवण्यात आला आहे. भेंडी बाजारातील बहुचर्चित 'हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना' ही अत्यंत धोकादायक झालेली इमारत अखेर पालिकेकडून पाडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आली असून इमारतीवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचे जुने घर आणि कार्यालय आहे. या ठिकाणी असलेल्या इमारतींवरही महापालिकेकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

इमारत धोकादायक असल्याने पालिकेची नोटीस

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, भेंडी बाजारात स्थित हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना ही इमारत राहण्यासाठी अत्यंत धोकादायक आणि जीर्ण झाली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने यापूर्वीच संबंधित रहिवाशांना नोटीस बजावली होती. ही इमारत तातडीने रिकामी करणे गरजेचे असल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार ती पूर्णपणे पाडण्यात येणार आहे.

दाऊदच्या वडिलांचे घर

मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील पाकमोडिया इस्टेट येथील मुसाफिरखाना इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, तिच्या भिंती आणि छत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या इमारतीला C-1 श्रेणीतील धोकादायक इमारत घोषित करण्यात आले आहे. कालच महापालिकेने या कारवाईची तयारी पूर्ण केली होती. त्यानंतर आज BMC कडून इमारतीवर हातोडा चालवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, याच परिसरातील या इमारतीचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे वडील इब्राहिम कासकर यांच्या घराशी असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर एक मशीद असून, तिचा वापर नागरिकांकडून केला जात होता.

कारवाईच्या पार्श्वभूमीवर या मशिदीचा वापर करणाऱ्या नागरिकांना इतरत्र जाण्याच्या सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. ही मशीदही पाडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या कारवाईत मशिदीला धक्का लागू नये, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. 'दाऊदचे घर पाडा; मात्र मशिदीला धक्काही लागता कामा नये,' अशी भूमिका घेत स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT