Mumbai Kandivali college controversy Sarkarnama
महाराष्ट्र

Mumbai Kandivali college controversy : वारंवार इशारा तरीही भाषा बदलेना; ठाकरे सेनेचा दणका अन् 'गुजराती' हटली, आता मुंबई विद्यापीठाची कारवाई सुरू!

Shiv Sena Thackeray leader Akhil Chitre and party workers removing Gujarati name at Balbharatis Maghanmal J Pancholia College in Kandivali : मुंबईतील बालभारती काॅलेजने दर्शनी भागातील प्रवेशद्वारावरील गुजराती भाषेतील नाव हटवून ठाकरे सेनेने मराठी भाषेतील नाव चिटकवले.

Pradeep Pendhare

Mumbai political news : मुंबईच्या कांदिवली भागातील बालभारती मगनलाल जे. पंचोलिया कॉलेज ऑफ कॉमर्स हे प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था ओळखली जाते. या संस्थेने प्रवेशद्वारावर गुजराती भाषेचा वापर, काॅलेजचे नाव लिहिले होते.

गुजराती भाषेतील नाव बदलून, तिथं महाराष्ट्राची मायबोली मराठी भाषेत लिहावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने लावून धरली होती. वारंवार मागणी करून देखील कारवाई होत नसल्याने पक्षाचे राज्य संघटक तथा शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे आणि शिवसैनिकांनी संस्था काॅलेजला दणका दिला. ठाकरे सेने पाठोपाठ मुंबई विद्यापीठाने देखील काॅलेजला नोटीस बजावली आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीनं मुंबई (Mumbai) विद्यापीठाचे कुलगुरू तथा निबंधक यांना, बालभारती मगनलाल जे. पंचोलिया काॅलेज आॅफ काॅमर्सने प्रवेशद्वारावरील नाव गुजराती भाषेत लिहिलं आहे. महाराष्ट्राची मायभाषा ही मराठी आहे. त्यानुसार काॅलेजने त्यांचे नाव मायभाषेतच लिहिवे, अशी मागणी केली. याचबरोबर काॅलेजकडे देखील मराठी भाषेचा वापर करून, नाव लिहावे, अशी मागणी केली.

मागणी करून देखील मराठी भाषाचे वापर करून, नाव लिहिण्याची कार्यवाही होत नव्हती. अखिल चित्रे आणि ठाकरे सेनेच्या (ShivsenaUBT) पदाधिकाऱ्यांनी बालभारती काॅलेजमध्ये जात, प्रवेशद्वारावरील गुजराती भाषेतील नाव हटवले. त्यानंतर तिथं मराठी भाषेतील फलक चिटकवला.

मराठी ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असून, राज्य सरकारच्या अधिसूचना, सरकार निर्णय व नियमांनुसार शैक्षणिक संस्थांनी मराठी भाषेत फलक लावणे बंधनकारक आहे. हा प्रकार राज्याच्या भाषेचा अवमान आहे, अशी टीका अखिल चित्रे यांनी केली.

बालभारती काॅलेजची चौकशी करा

भाषा धोरणाची अंमलबजावणी बंधकारक आहे. त्यानुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमांतर्गत विद्यापीठाला संलग्न महाविद्यालयांवर देखरेख ठेवण्याचा, स्पष्टीकरण मागवण्याचा व नियमांचे पालन सुनिश्चित करण्याचा अधिकार आहे. यानुसार बालभारती काॅलेजची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अखिल चित्रे यांनी मुंबई विद्यापीठाकडे केली.

विद्यापीठाची बालभारती काॅलेजला नोटीस

मुंबई विद्यापीठाने ठाकरे सेनेच्या आंदोलनाची, तसंच अखिल चित्रे यांच्या मागणीची दखल घेत, संबंधित काॅलेजला नोटीस बजावून, मराठी भाषेचा वापर करत काॅलेजचे नाव लिहावे, तसंच विद्यापीठ अधिनियमातील तरतुदींनुसार दंडात्मक कारवाई होईल, असे नोटिशीमध्ये म्हटले आहे.

मराठीसाठी आंदोलनाची वेळच येऊ नये

या सर्व प्रकारावर अखिल चित्रे म्हणाले, "आजही काही लोक आणि संस्था मराठीची उपेक्षा करतात, कधी उघडपणे तर कधी सूचकपणे. अशाप्रकारे वागणाऱ्यांना योग्य उत्तर मिळतेच आणि मिळत राहील. पण अशांना कायमस्वरूपी वटणीवर आणण्यासाठी कडक धोरण, प्रभावी अंमलबजावणी आणि ठोस कारवाई आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी मराठी माणसाला आंदोलन करायची वेळच येऊ नये, अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT