CJP Notice: मुंबईत शिवाजी पार्क मैदानात आंदोलनाला मोठी गर्दी जमवल्यानंतर आता सीजेपीचे कार्यकर्ते दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलनासाठी जाणार आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांना दिल्ली पोहोचण्यापूर्वीच पोलिसांकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. ही नोटीस स्वतः अभिजीत दिपके यांनी ट्विटरवरुन शेअर केली असून यामध्ये आमच्या दिल्लीच्या खर्चाचा तपशील पोलिसांनी मागितला आहे. तसंच दिल्लीत जाऊ नका कारण तिथं हिंसक आंदोलन होऊ शकतं असंही पोलिसांनी यात म्हटलं आहे. यावरुन पोलिसांना आधीच हे कसं काय माहिती की आंदोलन हिंसक होऊ शकतं? असा सवालही दिपकेंनी विचारला आहे.
अभिजीत दिपकेंनी ट्विटद्वारे सांगितलं की, "महाराष्ट्र पोलीस CJPच्या स्वयंसेवकांना नोटिसा पाठवून त्यांच्या दिल्ली प्रवासाच्या खर्चाचा तपशील मागत आहेत आणि आंदोलन हिंसक होऊ शकते, अशी धमकीही देत आहेत. ते असा दावा कसा करू शकतात? आमच्या शांततापूर्ण आंदोलनात व्यत्यय आणण्यासाठी आधीच काहीतरी कट रचला जात आहे का? नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा 'ज्ञानेश कुमार यांचे संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे का? असं संतप्त सवालही त्यांनी विचारला आहे.
चंद्रपूरच्या बल्लारपूर पोलीस स्टेशनंकडून सीजेपीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आली असून BNSSच्या कलम १६८ नुसार ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटिशीत म्हटलं की, कॉक्रोच जनता पार्टीनं १० ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्ली इथं मोर्चा काढणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही नवी दिल्लीला जाणार आहात असं समजलं. तुम्ही सीजेपीच्या आंदोलनात कशासाठी सहभागी होणार आहात? तुम्हाला आर्थिक सहकार्य कोण करत आहे? मोर्चामध्ये सहभागी होण्याचा तुमचा उद्देश काय आहे?
तुम्ही नवी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होऊ नये. विनापरवाना आंदोलनात सहभागी होऊ नयेत, तसंच हिंसक आंदोलकांना या मोर्चात सहभागी होऊ देऊ नका. सोशल मीडियावर हिंसक पोस्ट करु नये. तसंच आंदोलनात भडकाऊ भाषण करु नये. तसंच पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर सूचनांचं पालन करावे, कोणत्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल असं कृत्य करु नये. या सूचनांचे उल्लंघन करुन दखलपात्र गुन्हा घडल्यास किंवा घडण्याची शक्यता निर्माण झाल्यास परिस्थितीनुसार, कायद्यानुसार योग्य ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल, असं पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पाठवलेल्या नोटिशीत म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.