Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

MVA News : 'मविआ'चे मुंबईचे जागावाटप जवळपास फायनल; राज्यातील जागांसाठी आजपासून सलग तीन दिवस जोर'बैठका'

Political News : महायुती अन महाविकास आघाडीत आता जोरदार हालचाली घडत असून त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाने तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागावाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे महायुती अन महाविकास आघाडीत आता जोरदार हालचाली घडत असून त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

'माविआ'च्या तीन बैठकीत मुंबईच्या जागावाटपाचा पेच सुटला असल्याची माहिती समोर आली होती. त्यांनंतर आजपासून सलग तीन दिवस राज्यातील इतर जागेबाबत चर्चा सुरु होणार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा बुधवारी सायंकाळी उशिरा सुरु झाली आहे. मुंबईतील सोफीटेल हॉटेलमध्ये मविआची ही बैठक होत आहे. या बैठकीस महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut), अनिल देसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवार (Sharad Pawar ) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड या बैठकीसाठी उपस्थित आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारपासून सलग तीन दिवस जागावाटपासाठी बैठका पार पडणार आहेत. त्यातील पहिली बैठक ही बीकेसी येथील सोफीटेल हॉटेलमध्ये पार पडत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी याआधी तीन बैठका पार पडल्या होत्या. मुंबईचे जागावाटप जवळपास फायनल झाले असल्याचे समजते.

यापुढील काळात मुंबईसोडून राज्यातील इतर जागाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील जागावाटप कशा पद्धतीने असावे याबाबत बुधवारच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

दरम्यान, सध्याचे जागावाटप ठरल्यानंतर अंतिम निर्णय हा महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून घेतला जाणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि काँग्रेसचं हाय कमांड जागावाटपाबाबत काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

महायुतीचं जागावाटप लवकरच पूर्ण होणार?

दरम्यान, महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट या तीन पक्ष आग्रही असलेल्या जागांचा तिढा वरिष्ठ पातळीवर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोडवला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत दोन स्वतंत्र बैठका झाल्या आहेत. ज्या कॉमन जागांवर आग्रह आहे, अशा जागांबाबत चर्चाही झाली. मात्र, ज्या जागांवर तीनही पक्ष आग्रही आहेत, अशा जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT