namo shetkari yojana 8th installment deposite; CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Agriculture Minister Dattatray Bharne, Minister Uday Samant, Minister Dadaji Bhuse, and Minister Ashish Jaiswal sarkarnama
महाराष्ट्र

Namo Shetkari Yojana : 90 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! रखडलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खात्यात जमा, लगेच तपासा खाते

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana 8th Installment News Updates : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरण करण्यात आले आहे.

Aslam Shanedivan

  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

  • सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याची अधिकृत घोषणा केली.

Mumbai News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी असून अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी याची माहिती विधानसभेत दिली आहे. तसेच त्यांनी कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची ग्वाही दिली. तर बुधवारी (दि. २५ मार्च) जवळपास ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा ८व्या हप्त्याचे ५४ हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य म्हणून प्रति शेतकरी दरवर्षी रु. ६,००० अनुदान दिले जाते. तर यातच राज्य शासनाकडून आणखी रु. ६,००० इतकी भर घालण्यात आली आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी रु. १२,००० इतकी थेट मदत केली जाते.

मात्र पण पीएम किसानचा २१ वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात वितरीत झाल्यानंतरही नमोचा आठवा हप्ता जमा झाला नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरीत केल्यानंतर एका आठवड्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जातो. पण आठवा हप्ता जमा न झाल्याने राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

तर गेल्याच आठवड्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी, राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या ८ व्या हप्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केल्याची माहिती दिली होती.

त्यांनी थकलेल्या नमो शेतकरी योजनेच्या आठवा हप्त्याच्या वितरणाला सरकारने मंजुरी देत शासन निर्णय जारी केल्याचे सांगत १ हजार ७७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे म्हटले होते. तसेच नमो शेतकरी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती.

यानंतर आता बुधवारी (दि. २५ मार्च) मुख्यमंत्री फडणवीस यांनी जवळपास ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ५४ हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती विधानसभेत अधिवेशादरम्यान दिली. ते अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावर बोलत होते. यावेळी निवेदन सादर करताना त्यांनी नमो शेतकरी योजनेच्या आठवा हप्त्याच्या वितरणाबाबत माहिती दिली.

तसेच फडवणीस यांनी, केंद्र सरकारकडून सहा हजार आणि राज्य सरकारकडून सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेतंर्गत जवळपास ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे १,८०० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचेही माहिती विधानसभेत दिली. तसेच त्यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजने'च्या अंतर्गत ८९,७५,२९८ शेतकऱ्यांच्या खात्यात आठवा हप्ता वितरित करण्यात आल्याचे सांगितले.

FAQs :

1. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा झाला?
➡️ मार्च 2026 मध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.

2. या हप्त्यात किती रक्कम मिळते?
➡️ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला निश्चित अनुदान रक्कम थेट खात्यात जमा केली जाते.

3. किती शेतकऱ्यांना याचा लाभ झाला?
➡️ सुमारे 90 लाख शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत.

4. पैसे खात्यात आले की नाही हे कसे तपासायचे?
➡️ बँक पासबुक, मोबाईल SMS किंवा अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून तपासता येते.

5. ही योजना कोणासाठी आहे?
➡️ महाराष्ट्रातील पात्र आणि नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत योजना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT