sharad pawar | Nana Patole sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole News : नाना पटोले खोचक बोलून गेले, शरद पवारांना दुखावले?

Nana Patole on Sharad Pawar : गेल्या काही काळातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पटोलेंनी राष्ट्रवादी काँग्रेस विशेषत: शरद पवार आणि अजित पवारांना लक्ष्य केलं होतं.

सरकारनामा ब्युरो

सत्ताधारी भाजपच्या खेळ्या, त्यांचे राजकारण, मोदी-शहांची धोरणे याचा अंदाज बांधून राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारांनी राजकीय भविष्य मांडले आणि काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे सांगून टाकले. लोकसभा निवडणुकीचा प्रचार टोकदार होत असतानाच पवारांच्या भाष्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. विलीनीकरणाच्या मुद्यावरून राजकीय वर्तुळात सत्ताधारी-विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाव्य विलनीकरणाकडे बोट दाखवून सत्ताधारी पक्षाचे नेते पवारांना 'टार्गेट' करीत आहेत.

त्याचेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या खोचक शैलीत पवारांना भलताच सल्ला दिली आहे. 'पवारांनी फक्त पक्षश्रेष्ठींचा सन्मान करावा,' असे सांगून पटोले यांनी विलनीकरणाच्या चर्चेत मिठाचा खडा टाकल्याचे बोलले जात आहेत. पटोले हे कधी पडद्याआडून किंवा उघडपणे बोलून पवारांविरोधात भूमिका मांडतात. याच पटोलेंनी आता पुन्हा सन्मानावरून अप्रत्यक्षपणे पवारांना डिवचल्याचे दिसत आहे. पटोलेंच्या बोलण्याने मित्रपक्षांत उलटसुलट 'रिअॅक्शन' येण्याची शक्यता आहे. मात्र, स्वागतही त्यांनी केले.

दरम्यान, गेल्या काही काळातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पटोलेंनी राष्ट्रवादी काँग्रेस विशेषत: शरद पवार आणि अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये मतभेदही उघड झाले. पटोलेंच्या बोलण्यावरून शरद पवारांनी अनेकदा त्यांना फटकारलं आहे. पटोले आणि पवारांच्यातील मतभेद जुने आहेत. त्यातच आता पटोलेंनी पुन्हा एकदा विलनीकरणाच्या मुद्द्यावरून सन्मान करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पटोले आणि पवार यांच्यात मतभेदाची ठिणगी पडू शकते.

नाना पटोले काय म्हणाले?

"अनेक पक्ष भाजपमुळे त्रासलेले असल्यानं काँग्रेस हा एकच पर्याय आहे, असं अनेक प्रादेशिक पक्षांना वाटतं. त्याआधारावरून शरद पवार यांनी विधान केलं असेल. काँग्रेस पक्ष मजबूत होत असेल, तर आमच्यासाठी चांगलंच आहे. पण, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा सन्मान सर्वांनी ठेवला पाहिजे," असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना डिवचलं आहे.

शरद पवारांनी काय म्हटलं?

"पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेसबरोबर अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादशिक पक्ष हे त्यांचं हित लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये विलीन होतील. मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कोणताही फरक दिसत नाही. वैचारकिदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरूंची विचारसरणी मानणारे आहोत," असं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT