Nana Patole sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole : तरुण बेरोजगार असतील तर प्रगती होणार कशी? - नाना पटोले

Nana Patole congress unemployed : "सरकारला महाराष्ट्राचा विकास नाही तर गुजरातचा विकास करायचा आहे," असे आक्रमक वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

Roshan More

Nana Patole News: देशात मागील काही वर्षांपासून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमालीची वाढताना दिसतेय. अनेक उच्चशिक्षित तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे शिक्षणावर १८% ते २८% जीएसटी लागू झाला तर दुसरीकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत.

यंदा म्हणजे २०२४ मध्ये बेरोजगारीचा दर ७.९% वरून ८.५% वर गेलाय. २०२४ च्या अहवालानुसार 'कामगार मनुष्यबळ सहभाग दर ३९.% वरून ५०.२% वर पोहोचलेला आहे. याचाच अर्थ असा की ५ कोटी लोकांना रोजगार मिळत नाही. २००५ साली जागतिक बँकेच्या मते, भारतातील महिलांचा 'लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट' २६ % होता, तो २०२० मध्ये १५.५ टक्क्यांवर आला आहे.

पाच वर्षात १.२५ कोटी महिलांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ४ कोटीहून अधिक लोकांना रोजगार मिळत नाही आणि २ कोटीहून अधिक लोकांनी निराशेत काम शोधण्याचे थांबवले आहे. लोकडाऊन नंतर बेरोजगारीचे प्रमाण अधिकच वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, पण त्यांनी ८ वर्षात किमान १२.५ कोटी नोकऱ्या देण्याऐवजी काढून घेतल्या.

भारताला २००८ पर्यंत ३४.३५ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. त्यातून दरवर्षी ३ ते ४ कोटी नवीन रोजगार मिळेल. सध्याच्या वेगाने सरकारला इतक्या नोकऱ्या देण्यासाठी १५६० वर्षे लागतील. केवळ नोटबंदीमुळे ५० लाखांहून अधिक लोकांनी नोकऱ्या गमावल्या. देशव्यापी लॉकडाऊनमध्ये १२.२० कोटी लोकांनी रोजगार गमावला. नवीन अहवालानुसार भारत ९०% जास्त लोकांचा पगार २५००० पेक्षा कमी आहे. तरूणाईला बरबाद करण्याचा सरकारचं धोरण आहे, असं देशातील तरूण वर्ग म्हणतो.

महाराष्ट्र हे भारत देशाचं आर्थिक केंद्र आहे. औद्योगिकरण झालेल्या महाराष्ट्रातले प्रकल्प एक एक करत गुजरातला स्थलांतरित होऊ लागले आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट, टाटा एअरबस प्रोजेक्ट, निवती सबमरीन प्रोजेक्ट, इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर, एनएसजी अँड सबमरीन पॉलिसी हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतरित झाले. परिणामी, महाराष्ट्रात होणाऱ्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या. "सरकारला महाराष्ट्राचा विकास नाही तर गुजरातचा विकास करायचा आहे," असे आक्रमक वक्तव्य महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

या स्थलांतरित प्रकल्पावरून नाना पटोले म्हणतात, "तरूणाईचं आयुष्य बरबाद करण्याचं काम सरकार करत आहे. जनाची नाही तरी मनाची तरी लाज त्यांना वाटू दे." बेरोजगारीमुळे राज्यात गुन्हेगारीचेही प्रमाण वाढत आहे. त्याचसोबत शिक्षण महाग झालं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे हे लोक गुन्हेगारीकडे वळत आहेत. सुशिक्षित असूनही नोकरी न मिळण्याचे कारण म्हणजे राज्यात असलेली नोकऱ्यांची अनुपलब्धता. देशाचे आर्थिक राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे जास्तीत जास्त तरूण वर्ग रोजगारासाठी महाराष्ट्रात येणे पसंत करतो. याचाच परिणाम म्हणजे नोकऱ्यांची संख्या कमी आणि लोकसंख्या जास्त, अशी गत झाली आहे.

नाना पटोले यांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हापरिषद शाळेत ९६ सुशिक्षित तरूणांची शिक्षक म्हणून भरती केली. जिल्ह्यात शिक्षणाची सोय अधिक चांगली करून दिली. त्यांनी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून तरूणांसाठी सातत्याने रोजगार मेळावे घेतले आहेत. त्यांनी साकोली येथील सेंदूरवाफा येथे मोठा रोजगार मेळावा भरवला होता. या रोजगार मेळाव्यात नाना म्हणाले की, "माझ्या मायभूमीतील तरूण- तरूणींच्या भविष्यासाठी आर्थिक संकल्पना साकारून महाराष्ट्रातील ५० च्या वर नामांकित कंपन्यांत रोजगार संधी उपलब्ध करून देणे हे माझे कर्तव्य आहे."

या मेळाव्यात तब्बल पाचशेपेक्षा अधिक तरूणांनी विविध प्रकारच्या अनुभव कार्याची नोंद केली. त्यानंतर व्यापार, मत्स्य व्यवसाय व शेती व्यवसाय अशा व्यवसायाला खूप चालना दिली गेली. "शिक्षणाच्या अभावामुळे बेरोजगारी वाढते, पण इथे सुशिक्षित असूनही नोकऱ्या नाहीत," अशी व्यथा तरूणांनी व्यक्त केली. "तरूण देशाचे भविष्य आहेत. हेच भविष्य धोक्यात असेल तर देशाची प्रगती होणार नाही" असं नाना पटोले यांचं मत आहे.

Facebook link Nana Patole

https://www.facebook.com/nanapatoleinc?mibextid=ZbWKwL

Instagram link Nana Patole

https://www.instagram.com/nanapatoleinc?igsh=MTJiYm56c21veTV5NA==

Twitter link Nana Patole

https://x.com/NANA_PATOLE?t=N2H_xQP8h6AMQVFp-bsD3Q&s=09

YouTube link Nana Patole

https://www.youtube.com/@nanapatoleinc

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT