Akola News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्या ऑडिओ क्लिपनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यावरून महायुतीमधील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने वातावरण तापले आहे. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी मनोज जरांगेंनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपवरून भाजप आणि राज्यातल्या फडणवीस सरकारवर मोठा आरोप केला आहे.
विरोधी पक्षांकडून गेल्या काही दिवसापासून देशभरात मत चोरीवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच जरांगे पाटलांची ऑडिओ क्लिप बाहेर काढली असल्याचे आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील महायुती सरकारवर केला आहे. देशातील मतचोरीवरच्या आंदोलनावरचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच ही ऑडिओ क्लिप समोर आणली असल्याचा आरोप त्यांनी अकोला येथे प्रसार माध्यमाशी बोलताना केला.
त्यासोबतच ऑडिओ क्लिप संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या 'वॉर रूम'मध्ये बनल्याच्या भाजपच्या आरोपावरही त्यांनी जोरदार पलटवार केला आहे.राज्यात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि सर्व सत्य समोर आणावे. गेल्या काही दिवसापासून मत चोरीच्या मुद्द्याला लोकांच्या मिळत असलेल्या प्रतिसादावरून भांबवलेले हे सरकार आता त्यावरून लक्ष हटविण्यासाठी ऑडिओ क्लिपसारख्या गोष्टी समोर आणत असल्याचे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीमधील भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडताच भाजपकडूनही प्रविण दरेकर, प्रसाद लाड व मंत्री नितेश राणे यांनी आरोप केले आहेत. दोन्ही पक्षातील नेत्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.