Narayan Rane

 

Sarkarnama 

महाराष्ट्र

नारायण राणेंनी तिघांना शिंगावर घेत जिंकली बँक..

महाविकास आघाडीतील तीन पक्ष विरुद्ध नारायण राणे (Narayan Rane) अशी ही लढत राज्यात रंगली

सरकारनामा ब्यूरो

सिंधुदर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नेतृत्वाखाली सिद्धिविनायक पॅनेलने 11 जागा जिंकत विजय मिळवला. महाविकास आघाडीला आठ जागा मिळाल्या. (Sindhudurg District Bank Election Result) हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सिंधुदुर्ग बॅंकेची निवडणूक राज्यात चर्चेची ठरली होती. 19 जागांवर ही निवडणूक झाली होती. त्यामुळे राणे यांच्या कणकवली आणि मुंबई येथील निवासस्थानी फटाक्यांची आतषबाजी जोरात झाली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपने आघाडी घेतल्यानंतर आता राणेंच्या मुंबई येथील बंगल्यावर देखील फटाके फोडण्यात आले. (Sindhudurg district bank election 2021 result)

महाविकास आघाडीचे पॅनेलप्रमुख सतिश सावंत हे चिठ्ठीवर पराभूत झाले. दुसरीकडे भाजपच्या पॅनेलचे प्रमुख राजन तेली हे सुद्धा विजयी होऊ शकले नाहीत. त्यामुळे दोन्ही पॅनेलप्रमुखांचा धक्का आपापल्या पक्षांना बसला. वैभव नाईक यांचे बंधू संजीव यांनी तेलींचा पराभव केला. तर विठ्ठल देसाई यांनी सावंतांना नशिबावर धूळ चारली.

नितेश राणे अटकपूर्व जामिनासाठी करावी लागणारी धावपळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सामंत, सतेज पाटील या मंत्र्यांनी घातलेले लक्ष यामुळे गेले काही दिवस राज्यात या निवडणुकीची चर्चा होती. केवळ 950 मतदार असलेल्यांना त्यामुळे मोठा भाव आला होता. त्यातून मोठी उलाढाल सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाली. राणे यांनी नवीन चेहरे जिल्हा बॅंकेत दिले होते. त्याचा उपयोग त्यांना झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीआधी शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पेटला होता. संतोष परब हल्ला प्रकरणानंतर (Santosh Parab attack case ) राजकीय राडा पाहायला मिळाला. हे प्रकरण पोलिसांत गेले. भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही हल्ल्याचा कटाचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनंतर सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणे यांचा शोध घेत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. आजच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. मात्र, राणे गटाने आपले वर्चस्व मिळवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT