प्रकाश लिमये
Narendra Mehta News : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या लोकदाराबारात आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या. आता बुधवारी (ता.२२) मेहता यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे दोघांनी आयोजित केलेल्या दरबारांच्या माध्यमातून एकमेकांवर निशाणा साधला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या मीरा रोड येथील मध्यवर्ती कार्यालयात आमदार नरेंद्र मेहता यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी १७३ नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या . त्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रकल्पाबाबत देखील तक्रारी करण्यात आल्या.
प्रताप सरनाईक नियमाचे उल्लंघन करून चेना गावात भव्य प्रकल्प उभारत आहेत. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असताना प्रकल्पाला परवानग्या कशा मिळतात, असा प्रश्न जनता दरबारात उपस्थित झाला.
त्याचप्रमाणे सरनाईक यांनी सरकारी जागेवर हॉटेल उभारले आहे. या अनधिकृत हॉटेल बाबत अनेक दिवसापासून तक्रार केल्या नंतरही प्रशासन कारवाई करत नाही अशी देखील तक्रार जनता दरबारात करण्यात आली. त्यावर तक्रारीची शहानिशा करून मगच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आमदार नरेंद्र मेहता यांनी संबंधितांना दिले.
याव्यतिरिक्त महानगपालिका, पोस्ट ऑफिस, पोलिस ठाणे, तहसीलदार कार्यालय, तलाठी कार्यालय, इमारतीचे प्रश्न, सोसायटी मधील वाद, रजिस्टर यांच्या सारख्या अनेक तक्रारी जनता दरबारात उपस्थित करण्यात आल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.