Narhari Zirwal, Sunetra Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Narhari Zirwal Resign : नरहरी झिरवळांना अभय, राजीनामा घेणार नाही! राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय

Narhari Zirwal resignation news: नरहरी झिरवळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. अखेर पक्षाने झिरवळ यांना अभय देण्याचा निर्णय घेतला आहे.

Roshan More

Narhari Zirwal latest political news: मंत्री नरहरी झिरवळ यांचे तृतीयपंक्षीयासोबत आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली होती. या व्हिडिओनंतर झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. झिरवळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करत या प्रकरणाबाबत खुलासा केला होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच मोठा निर्णय घेत झिरवळ यांना अभय देण्यात आला आहे.

पक्षाकडून झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या विषयी एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील आम्ही या व्हिडिओची सत्यता पडताळणार आहोत. दोन ते तीन व्हिडिओ एकत्र करून ते चुकीच्या पद्धतीने पसरवले असल्याचे झिरवळ यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आधीच धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. तसेच राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील नुकताच राजीनामा दिला होता.

त्यामुळे पक्षातून झिरवळ यांचा देखील राजीनामा घेण्याबाबत चर्चा होती. मात्र, दरवेळी आरोप झाले की राजीनामा घेणे योग्य नसल्याची पक्षातील वरिष्ठांचे मत होते. त्यामुळे झिरवळ यांना अभय देण्यात आले.

पक्षाची प्रतिमा मलीन होण्याची भीती

रुपाली चाकणकर आणि त्यानंतर नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला तर पक्षाविषयी लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशी चर्चा राष्ट्रवादी अंतर्गत होती. राष्ट्रवादीमधील मंत्री अडचणीत असताना पक्ष त्यांच्या बाजुने उभा राहत नाही, अशी देखील पक्षातील नेत्यांची धारण होईल त्यामुळे या प्रकरणाचा तटस्थ चौकशी केल्यानंतर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा पक्षातील नेते व्यक्त करत होते. त्यामुळे सध्या तरी झिरवळ यांना अभय मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT