Ashok Kharat controversy Maharashtra : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या राजकीय संबंधावरून, राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. राज्यातील नेत्यांबरोबर विशेष करून कोकणातील नेत्यांबरोबर असलेल्या संपर्क, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असलेली चलती, यातून राज्यभरात अंकशास्त्रज्ञ म्हणून अशोक खरात नावारूपास आला.
यातून निर्माण झालेलं खरातचं प्रस्थ, सुरस कथांची, अनेकांना भुरळ पडली. अशोक खरातच्या शोषणाला अनेक महिला बळी पडल्या. आता याचा भांडाफोड झाला आहे. खरातभोवती सुरस कथांच्या मोहोत राज्यातील अनेक राजकीय नेते बळी पडले. पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही खरातबद्दलची आप बिती सांगितली.
नाशिकमधील (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात याने महिला लैंगिक शोषण प्रकरण हे आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असलेल्या एफस्टीन फाईलसच्या पण पुढे असल्याची टिप्पणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. यानंतर अशोक खरात आपल्याला कसा बोलवत होता, याची आप बिती जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, "अशोक खरात हा मला सुद्धा सारखा-सारखा बोलवत होता. एकदा तर मी शहापूरपर्यंत गेलो होतो. पण, माझ नशीब चांगलं, मंत्रालयातून फोन आला आणि मधूनच मी माघारी फिरलो." लोकं खूप कौतुक करायचे म्हणून मी पाहायला जाणार होतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, "नशीब हा खरात आहे, खान असता तर गोंधळ उडाला असता. मी खरातच्या पायाच पडणार आहे, हा साधे चिंचुके पॉलिश करुन अंगठीमध्ये घालायचा आणि त्याचे 1 लाख रुपये घ्यायचा." मी चाकणकर यांच्यावर बोलणार नाही पण उगाच का काही घडतं? जयंत पाटील, निलेश लंके काय सगळ्यांचेच फोटो आहेत, असेही आव्हाड यांनी म्हटले.
भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी तपासासाठी चांगलाच जोर वाढवला आहे. सुरवातीला तोऱ्यात असलेला अशोक खरात हा पोलिसांच्या खाक्यासमोर गुडघ्यावर आल्याचे पाहायला मिळालं. एसआयटी पथकाने भोंदू खरातची सात तास चौकशी केली. यातून भोंदू एक-दोन वेळा क्षीण आवाजात 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला', असे म्हणतानाचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.