Mumbai News: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात चांगलेच गाजत आहे. या प्रकऱणात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे.राजकीय वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत.लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला अशोक खरात हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांनाही अध्यात्मिक मार्गदर्शक असल्याचं बोललं जात आहे. यात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांचाही समावेश आहे. आता याच चाकणकरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
रुपाली चाकणकरांनाही अशोक खरातशी जवळचे संबंध असल्याचं समोर आल्यानंतर सुरुवातीला महिला आयोग अध्यक्षपद आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद अशा एकापाठोपाठ दोन मोठ्या पदांचे राजीनामे द्यावे लागले होते. तसेच एसआयटीकडून त्यांना चौकशीसाठी नोटीसही पाठवण्यात आल्याची चर्चा रंगली होती. पण चाकणकर विविध कारणं देत चौकशीला सामोरे गेल्या नसल्याचंही बोललं जात आहे. त्याउलट त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकरांनाही नोटीस आल्यानंतर त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या होत्या. पण चौकशीला सामोरे न गेलेल्या रुपाली चाकणकरांना आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची अशोक खरात आणि रुपाली चाकणकरांवर होत असलेल्या गंभीर आरोपांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. त्या म्हणाल्या, अशोक खरात प्रकरणात जे दोषी आहेत,त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावरही आरोप झाले.त्यानंतर त्यांनी आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामाही दिलेला आहे.
या प्रकरणाचा पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू आहेत.एसआयटी आपले काम करत असून महाराष्ट्र पोलिस अत्यंत नि:पक्षपातीपणे या खरात प्रकरणाचा तपास करतील,असा विश्वासही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांनी व्यक्त केला आहे.
विजया रहाटकर यांनी यावेळी रुपाली चाकणकरांना मोलाचा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या, पोलीस ज्या-ज्या वेळेला चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावतील,त्या-त्या वेळेला त्यांनी चौकशीसाठी जायला हवं. पोलिसांना सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे.ते सहकार्य चाकणकर यांनी पोलिसांना करावं, असंही मत रहाटकर यांनी व्यक्त केलं आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीच्या तपासात एकापेक्षा एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात शिर्डी पोलिसांकडून समता पंतसंस्थेमधील संशयित खातेदार प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची 13 एप्रिलला तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली होती. यानंतर प्रतिभा चाकणकरांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.
प्रतिभा चाकणकरांच्या चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी अशोक खरात प्रकरणी कोणत्याही आर्थिक व्यवहार,जमीन व्यवहार व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही. शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच,हा माझा दृढ विश्वास आहे, असं म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.