दार उघड, बया दार उघड !
अलक्ष्यपुरभवानी, दार उघड बया !
माहूरलक्ष्मी, दार उघड बया !
कोल्हापूरलक्ष्मी, दार उघड बया !
तुळजापूरलक्ष्मी, दार उघड बया !
तेलंगणलक्ष्मी, दार उघड बया !
कन्नडलक्ष्मी, दार उघड बया !
पाताळलक्ष्मी, दार उघड बया !
अष्टभुजालक्ष्मी, दार उघड बया !
पंढरपूरनिवासिनी, दार उघड बया !
नमो निर्गुण निराकार । आदिमाया तू साकार
घेउनि ‘सिंदूर’अवतार। करिसी दुष्टांचा संहार
यवनभूमीवर म्लेंच्छ मातला । तेणे भक्त गांजिला
पेहलगामीचे रक्तलांच्छन। मांडिला उच्छाद फार
दार उघड, बया दार उघड
हार न पाहवें तुजला। त्वा उग्ररूप धरिलें
क्रोधें सीमा भेदून । ‘ब्राह्मोस’ अस्त्रांनी वेधिले
दैत्यांसी त्या वधून । अभिमान त्वा रक्षिला
चहु बाजूंनी शत्रूस । रोखिले अन् वेढिले
दार उघड, बया दार उघड
निष्पापांच्या कैवारें । सर्प मारिले सपरिवारें
अतिरेकी भरे कापरे । आंदोळले ते ‘पीओके’
अग्निवर्षाव यवना जाळी । दहशतवाद तळांची होळी
भले भले शत्रू बळी । जणू रक्तपंचमी रंगे खेळी
दार उघड, बया दार उघड
विसरला शेजारधर्म । अतिरेकी ठेवी लपवून
रक्त सांडिले निष्पाप । पाक-चीन एक झाले
म्लेंच्छे गांजिले हिंदू भक्ता । धर्म विचारोनि
त्वरे चालविल्या फैरी । पुरूष गतप्राण झाले
दार उघड, बया दार उघड
वाग्दोर हाती धरूनी । वाग्बाण बरसवुनि
व्योमिका, सोफिया । सांगे कवतुके शौर्यगाथा
अवघा शक्तिकल्लोळ । सीमापार चालतसे
अडवोनि सिंधू सरिता । पळवे तोंडचे पाणी आता
म्लेंच्छभूमीवरी भम भम भम। दण दण दण कडक कडक
तोचि गोंधळ अंबे तुजप्रती । बया दार उघड, दार उघड
दार उघड, बया दार उघड
वरुणराजा कोपला । करी नुकसान अभद्र
आकांत भयंकर । तांडव करितो रूद्र
खवळला जलौघ । जणू प्रलय संचरला
भीषण पुराने अवघा । भूमिभाग विंचरला
दार उघड, बया दार उघड
कीं मेघ डफावर। कडकड वाजे बिजली
डमडमले डमरू । सूर्यमालिका विझली
बेभान थैमान, बुडाले रान। जलाशय फुटले
घोंघावत वारे सुटले। अस्मानी वादळ उठले
दार उघड, बया दार उघड
आभाळ कोसळे । उठती डोंगरलाटा
कलथुनि गेली पिके। दैव न्याय उफराटा
भूमिपुत्र कळवळला । जाहला तो बेभान
नुकसान झाले केवढे । थांबव गे हे थैमान
दार उघड ! बया दार उघड !
दार उघड ! दार उघड ! दार उघड !
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.