Nawab Malik sarkarnama
महाराष्ट्र

सगळ्यात जास्त भाजपचे नेते दारु पिणारे ; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

भाजपच्या नेत्यांची वाईनची दुकाने आहेत ती बंद करणार आहेत का? असा सवाल उपस्थित करतच दारू पिणारे सगळ्यात जास्त भाजपचे नेते आहेत.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. त्याठिकाणी एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. नवाब मलिक म्हणाले,''भाजपचे नेते विखे पाटील यांचा दारूचा रॉकेट ब्रॅण्ड आहे. तसंच भाजपचे नेते हे बंद करणार आहेत का ? भाजपच्या नेत्यांची वाईनची दुकाने आहेत ती बंद करणार आहेत का? असा सवाल उपस्थित करतच दारू पिणारे सगळ्यात जास्त भाजपचे नेते आहेत. दारू म्हणजे औषध आहे. ”थोडी थोडी पिया करो” असा मंत्र चार दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञासिंग यांनीच दिला आहे,''

पेगासस प्रकरणावरून कॉग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा भाजपच्या कार्यालयावर नेण्यात आला. याठिकाणी भाजपचे नेते, कार्यकर्ते यांनी या मोर्चाला अडविले. त्यावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावरुन राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिले आहे. त्यांनी समाजमाध्यमावर याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.

नवाब मलिक म्हणाले, ''राजकीय पक्षांनी आंदोलनात काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. एखाद्या राजकीय पक्षाने दुसऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यालयावर, नेत्यांच्या घरी आंदोलन करणे योग्य नाही. दुसर्‍या राजकीय पक्षाच्या आंदोलनात घुसणेही योग्य नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक पक्षाने याबाबत आचारसंहिता लागू केली पाहिजे, आंदोलनाची ही पद्धत थांबली पाहिजे, सर्व पक्षांनी आचारसंहिता पाळली पाहिजे,''

मुंबईत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्त्वात यूथ काँग्रेसकडून पेगाससच्या मुद्यावरुन भाजपच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येत होते. हा मोर्चा पोलिसांनी अडवला. भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) आक्रमक होत त्यांनी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसह ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दिशेनं निघाले होते मात्र पोलिसांनी भाजपचा मोर्चाही अडवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT