nawab malik Daughters
nawab malik Daughters  Twitter
महाराष्ट्र

होय मी भंगारवाल्याची मुलगी, मला अभिमान आहे!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर तिखट शब्दात टीका केली. मलिक यांची संभावना भंगारवाला म्हणून केली जाते. या टिकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. होय, मी भंगारवाला आहे! आणि या शहरात जेवढे भंगार आहेत, त्यांचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे आणि यांचं पाणी केल्याशिवाय थांबणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. भाजप नेते मोहन भारतीय यांनी मलिक यांच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्याविषयी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता ही मंडळी माझी किंमत वाढवत आहेत. माझी सगळी संपत्ती विकली तरी एवढी रक्कम जमणार नाही. मी भंगारवाला आहे, अशी ही टीका ही मंडळी करत असतात. होय, मी भंगारवाला आहे. याचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिले.

मात्र त्यानंतरही नवाब मलिक यांना सोशल मिडीयावर भंगारवाला म्हणून ट्रोल केले जात आहे. आता यावर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक-शेख यांनी ट्विट करत टीकाकारांना उत्तर दिले आहे. सना मलिक यांनी म्हंटले आहे की. "होय मी भंगारवाल्याची मुलगी! मला अभिमान आहे. मी मराठी मुलगी," असं म्हणत त्यांनी वडिलांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी #NawabMalikMyHero हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.

नवाब मलिक म्हणाले,

मी वयाच्या सोळाव्या वर्षांपासून भंगारचा धंदा करत आहे. माझे माझ्या घराशेजारीच गोडाऊन आहे. पण मी सांगू इच्छितो की माझ्या आजोबाने कुठल्याही डाकूकडून सोन घेतलं नाही. मी मुंबईत सोन्याची तस्करी केलेली नाही. मी खोटेनाटे करून बँकेचे पैसे खाल्लेले नाहीत. माझ्यावर कधी इन्कम टॅक्सची रेड पडली नाही, अशा शब्दांत त्यांनी भारतीय यांना टोला लगावला. भंगारचा धंदेवाला काय करतो? तर जी बिनउपयोगाची वस्तू किंवा लोखंड आहे ते वितळवतो आणि त्याचे पाणी पाणी करतो. आता या नेत्यांनाही कळाले असेल की एका भंगारवाल्याचे नादी लागणे किती अवघड आहे ते, अशा आक्रमक शब्दांत त्यांनी भूमिका मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT