Nawab Malik  
महाराष्ट्र

नवी मुंबईच्या बंदरात 51 टन अफू तरीही एनसीबीचे दुर्लक्ष

ड्रग्जचा व्यवसाय राजकीय पाठबळाशिवाय चालू शकत नाही.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीच्या (NCB) अधिकाऱ्यांना लक्ष्य करत जेएनपीटी बंदरावर गेले तीन दिवस 51 टन अफूचे बीज असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली. तसेच एनसीबीचे अधिकारी छोट्या प्रमाणात कारवाई करून मोठ्या गुन्हेगारांना सोडून देत खंडणीचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप आजच्या पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, ``समीर वानखेडे प्रामणिक आहेत तर त्यांनी आतापर्यंत ज्या मोठ्या लोकांना पकडले त्यांच्यावर कारवाई का केली नाही? फक्त काही ग्रॅम ड्रग्जवर कशी काय कारवाई केली? असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर गेल्या १५ दिवसांपासून तीन कंटेनर भरून ५१ टन अफूचे बीज जेएनपीटी बंदरात आल्याचे सांगत मोठा धक्काच दिला आहे. त्याचबरोबर, मुंद्रा पोर्टवर हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले त्याठिकाणी आणि अफूच्या कंटेनरवर कारवाई का नाही केली? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

ड्रग्जचा व्यवसाय राजकीय पाठबळाशिवाय चालू शकत नाही. ड्रग्जचा विळखा कायमचा नष्ट करण्यासाठी आम्हीदेखील सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. पण जर ड्रग्जच्या माध्यमातून वसुली गोळा केली जात असेल तर याच्या विरोधात लोकांनी उभे राहिले पाहीजे, असे आवाहन मलिक यांनी केले.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आणखी एक खळबळजनक खुलासा केला आहे. एनसीबीच्या सिंग नावाच्या अधिकाऱ्याने आपल्या जावयाकडे लॅंड क्रुझर गाडीची मागणी केली होती, असा आरोपही त्यांनी केला. तर जेएनपीटी बंदरावरील अफूच्या कंटेनरहबाबत मालाबाबत आपल्याला अजून माहिती मिळत असून ती येताच माध्यमांना देणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. मलिक यांच्या आरोपावर एनसीबीकडून सायंकाळी चारपर्यंत कोणताही खुलासा आलेला नव्हता.

पत्रकार परिषदेत मलिक यांनी जास्मिन वानखेडे यांच्या व्हॉट्सअप चॅटचे काही फोटो दाखवले. जास्मिन वानखेडे या सुरुवातीपासून बोलत होत्या की, त्या आपल्या भावाच्या कामात दखल देत नाहीत. पण या चॅटद्वारे असे दिसते की, ड्रग्ज प्रकरणात अडकलेला एक व्यक्ती यास्मिन वानखेडे यांना व्हॉट्स अॅपवर त्यांचा पत्ता आणि व्हिजीटींग कार्ड मागत आहे. यावरुनच वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी आणि त्यांची बहिण लेडी डॉन वसुलीमध्ये सामील असल्याचा आरोप मलिक यांनी केला.

त्यामुळेच वानखेडे महाराष्ट्र पोलिसांच्या अटकेपासून पळत आहेत. म्हणूनच त्यांनी सीबीआयद्वारे चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तरीही महाराष्ट्र पोलीस याची चौकशी करतीलच. माझ्या बोलण्यावर बंधने आणण्यासाठी ते याचिका दाखल करत आहेत. जर त्यांची बाजू सत्याची असेल तर त्यांनी चौकशीला सामोरे गेले पाहीजे. ज्यादिवशी वानखेडे यांच्यावर कारवाई होईल, त्यादिवशी लोक समोर येऊन यांच्या वसुलीचा भांडाफोड करतील. तसेच लोकांनीही स्वतःहून समोर येऊन यांच्याबद्दलचे सत्य मांडावे, असे आवाहन मलिक यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT