A historical 1759 Maratha Empire map showing territorial expansion from Cuttack to Attock, central to the ongoing NCERT textbook controversy. Sarkarnama
महाराष्ट्र

NCERT Map Controversy : राजपूतांच्या दबावामुळे मराठ्यांच्या इतिहासाशी छेडछाड; आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा 'तो' नकाशा हटवला

Shivaji Jayanti news, NCERT Class 8 history book : ऐन शिवजयंती दिवशीच एनसीईआरटीने आठवीच्या पुस्तकातून 1759 सालचा मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा पुस्तकात पुन्हा प्रकाशित करण्याची मागणी मुधोजीराजे भोसलेंनी केली आहे.

Jagdish Patil

NCERT Map controversy : एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात असललेला 1759 सालचा मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एकतर्फी हटवला असून राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली एनसीईआरटीने हा खोडसाळपणा केल्याचा आरोप मुधोजीराजे भोसले यांनी केला आहे.

ऐन शिवजयंती दिवशीच मुधोजीराजेंनी एनसीईआरटीने केलेला खोडसाळपणा उघडकीस आणल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुस्तकातून हटवलेला 1759 सालचा मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा पुस्तकात पुन्हा प्रकाशित करण्याची मागणी मुधोजीराजेंनी नागपुरातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

1759 सालचा मराठा साम्राज्याचा 'कटक ते अटक' असा विस्तार दाखवणारा नकाशा एनसीईआरटीच्या आठवी इयत्तेच्या पुस्तकात छापला होता. मात्र, नकाशा चुकीचा असल्याचा आरोप करत राजस्थानमधील काही राजपूत संघटनांनी तो नकाशा हटवण्याची मागणी केली होती.

या मागणीसाठी राजस्थानमधील काही राजघराण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे पाठवुरावा केला होता. त्यानंतर एनसीईआरटीने शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या आठवीच्या पुस्तकामध्ये तो नकाशा प्रकाशित केला नाही. शिवाय नकाशा पुस्तकातून हटवण्यासाठी जी समिती कार्यरत होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील एकही जाणकार इतिहासकार नव्हता.

त्यामुळे हा निर्णय एकतर्फी आणि राजपुत संघटनांच्या दबावातून केल्याचा आरोप मुधोजीराजेंनी केला आहे. 'कटक ते अटक' पर्यंत मराठा साम्राज्य विस्तारलेला असताना, जर राजस्थानचा भाग मराठ्यांचे अधिपथ्यखाली नव्हता, तर मराठे महाराष्ट्रातून अटक पर्यंत पोहोचले कसे? असा सवाल ही मुधोजीराजांनी उपस्थित केला आहे.

तर हा नकाशा पुस्तकातून हटवणे ऐतिहासिक तथ्याशी छेडछाड करण्यासारखे असून महाराष्ट्र सरकार आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने हा मुद्दा उचलून धरावा आणि तो नकाशा पुन्हा आठवीच्या पुस्तकात छापण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीही मुधोजीराजेंनी केली आहे. तर दुसरीकडे ऐन शिवजयंतीदिवशी मराठ्यांच्या इतिहासाची छेडछाड करणारी बाब समोर आल्यामुळे अनेकांकडून एनसीईआरटीच्या कृतीवर संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT