प्रशासनावर वचक, प्रत्येक क्षेत्रातील गाढा अभ्यास आणि राजकीय क्षेत्रावर प्रभाव टाकणारा चेहरा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. दादांची भाषण शैली आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांना अजितदादांची भुरळ असायची. त्यांच्या स्पष्ट आणि जलद निर्णय क्षमतेमुळे अनेक अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा धाक असायचा. खासदार झाल्यापासून ते उपमुख्यमंत्री असेपर्यंत अजितदादा यांची काम करण्याची पद्धत तितकीच धाडसी आणि कौतुकाची असायची. पण आज संपूर्ण राज्य साखर झोपेत असताना अजितदादा भल्या पहाटे आपला दिनक्रम सुरू करायचे. सकाळी लगभग असायची.
पण आज अजितदादांना याच पहाटेच्या दिनक्रमात मृत्यूने गाठलं हे फार दुर्दैव म्हणावे लागेल. जिल्हा परिषद पंचायत समिती याची निवडणुकीची धामधूम सुरू असताना आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला रंगतदार येणार होते. निवडणुकीचा माहोल सुरू झाला असताना सकाळी धक्कादायक बातमी समोर आली. अजित पवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी बारामती येथे जात असताना विमान अपघात झाला. बारामतीत लँडिंगदरम्यान अजित पवार यांचं विमान कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली. या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या बातमीमुळे संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
१९८२ मध्ये अजितदादांनी इंदापूरमधील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या माध्यमातून त्यांनी राज्यात राजकारणाला सुरुवात केली. खासदारकीपासून त्यांनी राज्यात उपमुख्यमंत्रीपदापर्यंत यांनी मजल मारली. मध्यंतरी राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर त्यांनी तितक्याच ताकदीने त्यांची भूमिका पुढे नेली. 2024 च्या राजकारणात देखील अजितदादांकडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तितक्याच निर्भीडपणे चालवली.
अजितदादांनी राज्याचे अर्थमंत्री पद सांभाळत असताना प्रत्येक क्षेत्राला न्याय देण्याची भूमिका त्यांची राहिली. राज्यभरातील कोणत्याही जिल्ह्याचा दौरा असला की सर्वच अधिकारी भीतीच्या छायेखाली असायचे. एखादा अधिकारी वेळेत आला तर त्याचे कौतुक व्हायचे, वेळेवर आला नाही तर त्याची खरडपट्टी देखील व्हायची. आज सकाळी मात्र ज्या उत्साहाने अजितदादांनी आपला दिनक्रम सुरू केला होता. तो नीतीला मान्य नव्हता. ज्या भल्या पाहटे ते कामकाजाला सुरुवात करत होते. त्याच वेळेत अजितदादांना महाराष्ट्रापासून हिरावून घेतलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.