Ajit Pawar 2 Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar : 'दादाचा वादा'; अजितदादांच नवीन गाणं विरोधक देखील 'प्ले' करतायत

Pradeep Pendhare

Mumbai News : जनसन्मान रॅलीतून राज्यभर गुलाबी रंगाची उधळण करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवे गाणे प्रदर्शित केलं आहे.

गाण्याचे बोल 'दादाचा वादा' असं असून, गाण्याचे संगीत ठेका, तर बोल गुणगुणायला लावतात. त्यामुळे अजितदादांच्या राजकीय प्रतिमेला, हे गाणं किती उजळवणार, आगामी काळच सांगेल. मात्र, समाज माध्यमांवर 'दादाचा वादा' हे गाण चांगलच व्हायरल होत आहे. विरोधकांनी देखील हे गाणं 'प्ले' करून ऐकत आहेत.

पावसाळी अधिवेशनात अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी राज्यात जनसन्मान रॅली सुरू केली. रॅलीच्या निमित्ताने अजित पवार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अजितदादांनी रॅलीला गुलाबी रंगाला प्राधान्य दिलं आहे. या रॅलीची धास्ती विरोधकांनी घेतलीय. (NCP) अजितदादा प्रत्येक रॅलीत महिला, ज्येष्ठ, युवक-युवती, तरुण-तरुणी यांच्याशी संवाद साधतात. रॅलीचा प्रभाव पडावा म्हणून, आता अजित पवार गटाने पुढचं पाऊल टाकलं आहे. नवीन गाणं 'दादाचा वादा', प्रदर्शित केलं आहे.

अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्या 'एक्स' हँडवर देखील हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. "सांगून आलोया, थांबायचं नाय आता, जिंकायचं हाय म्हणजे जिंकायचं हाय, गुलाल आपलाच उधळायचा तोवर, मागं पुढे आता बघायचं नाय... धडाधडा काम सपाट्याचा आता वेग धरा, धराधराधरा आता ध्यास आता एक धरा... जोश धगधगता अंगात रगरगता, ऐकणार नाय कुणा आता... असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचं संगीत देखील ठेका धरायला लावणारं आहे. त्यामुळं हे गाणं सर्वसामान्यांचं नक्कीच लक्ष वेधून घेईल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी व्यक्त करत आहे.

जागा जिंकून आणण्याचं टार्गेट

राज्यात दिवाळीपूर्वी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष मोर्चेबांधणीत गुंतले आहे. यात महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र गुलाबी वाट निवडली आहे. जनसन्मान रॅलीतून सर्वसामान्यांपर्यंत अजितदादा पोचण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात सत्तेत दबदबा ठेवण्यासाठी किमान 60 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं टार्गेट अजित पवारांनी ठेवल्याचं सूत्राचं म्हणणं आहे.

महायुतीत अजितदादा टार्गेट

महायुतीत सध्या जागा वाटपावरून नेते वेगवेगळी विधानं करत आहेत. यातून महायुतीत बेताल विधानांची स्पर्धा सुरू झाली असून, त्यावरून वादळ उठलं आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केलं आहे. तसंच शिवसेनेने देखील अजित पवारांना टार्गेट केलं आहे. यावर अजितदादांनी कोणतीही प्रतिक्रिया देत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते महायुतीमधील बेतालविधानावरून मित्रपक्षांवर तुटून पडताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात अजित पवार राज्याच्या राजकारणात स्वतंत्र दिसतील, असे देखील बोलले जात आहे.

विकास कामांवर प्रचार

अजितदादांनी देखील राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्धार केलेला दिसतो आणि तसे जोरदार प्रयत्न देखील सुरू आहेत. अजितदादांनी जनसन्मान रॅलीतून त्यांच्याकडील अर्थ खात्यानं केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत आहे. तसा अजितदांदानी विकास कामांवर भर दिला आहे. तसं अजित पवार देखील आवर्जुन सांगतात की, "मी विकास कामांचा रथ घेऊन जनतेत चालतोय. मी कोणावर टीका करणार नाही. मी माझं काम करत राहणार". अजित पवारांची ही भूमिका राज्यातील मतदारांना आणि जनतेला कितपत भावते हे विधानसभा निवडणुकीतच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT