Wardha News: अल्पवयीन मुलीकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. दिवाकर गमे यांना अटक करण्यात आली आहे.नोकरीच्या आमिषाने 5 वर्षांपासून तो हे दुष्कृत्यकरीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडित युवतीने पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोक्सोअंतर्गत गमे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. महिलादिनी काल रविवारी ही कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करीत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता गमे यांच्या विरोधात काय कारवाई केली जाते, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
दिवाकर गमे हा राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे. ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून गमे यांची ओळख आहे. ते 'महाज्योती' या संस्थेत काही वर्षांपूर्वी संचालक म्हणून कार्यरत होते. ओबीसी प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत.
नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून गमे यांने पीडित तरुणीचा फायदा घेत त्याने पाच वर्षांपासून तीचे शारीरिक आणि मानसिक शोषण करीत होता. त्याने पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिचा सातत्याने छळ केला. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितीने पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य ओळखत पुलगाव पोलिसांनी ७ मार्चच्या सायंकाळी गमे यांना अटक केली. पोलिसांनी त्यांचा मोबाइलही जप्त केला आहे. यातून आणखी काही धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेक दशकपासून जिल्ह्याच्या राजकारणात व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे.
त्याच्या स्वतःच्या शिक्षण क्षेत्रात अनेक संस्था आहेत.
त्याच्या संस्थेत नोकरीसाठी अनेक बेरोजगार त्यांच्याकडे येत असतात.
गमे हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात प्रामुख्याने सक्रिय आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.