Amol mitkari nitesh rane sarkarnama
महाराष्ट्र

Amol mitkari : अमोल मिटकरींनी नितेश राणेंची अब्रुच काढली, 'ते फुलटाईम...'

Roshan More

Amol mitkari News : नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने त्यांच्या विरोधात अजित पवार गट दिल्लीत तक्रार करणार असल्याचे वृत्त होते. त्यावर बोलताना

अजितदादांना कुठे तक्रार करायची ती करू द्या. मी माझ्या हिंदुत्वाशी अजिबात तडजोड करणार नाही, असं राणे म्हणाले होते. राणेंच्या या प्रतिक्रियेनंतर अमोल मिटकरी यांनी राणेंना कडक शब्दांत सुनावले आहे

'नितेश राणेंनी अर्ध्या हळकुंडा सारखं पिवळं होऊ नये. बैठकीत काय चर्चा झाली माहिती घ्यावी. पत्रकारांचा माईक दिसला की फक्त उड्या मारू नये. माहिती घेऊन बोलावं.', असा टोलाच मिटकरींनी राणेंना लगावला.

'कोणत्याही धर्माच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करत असतील तर राष्ट्रवादी भूमिका मांडणारचं. सर्वसामान्यांची पोरं कामाला लावायची आणि तुम्ही एसीमध्ये बसायचं. हे धंदे त्यांनी बंद करावे.', या शब्दांत अमोल मिटकरी यांनी राणेंना खडसावले आहे.

'महाराष्ट्रात ओला दुष्काळाच सावट असतानाच शेतकऱ्यांच्या पोरांच्या हाती तलवारी, बॉम्ब देण्याच्या भाषा सुरुये. ते बंद करावं ज्यांनी ते स्वतः अडचणीत येणार. एक मित्र म्हणून हा त्यांना सल्ला आहे.', असे देखील मिटकरी म्हणाले.

राणे फुलटाईम रिकामे

अजितदादांना कुठे तक्रार करायची ती करू द्या, या राणेंच्या वक्तव्याचा समाचार मिटकरी यांनी घेतला. अजितदादा कामाची व्यक्ती आहेत. नितेश राणे फुलटाईम रिकामे आहेत. त्या व्यक्तीला कामधंदा नाहीये म्हणून बडबड करत राहतो, अशी नितेश राणेंची खिल्ली अमोल मिटकरींनी उठवली.

त्यांच्या गोळ्या संपल्या...

मिटकरी म्हणाले, त्यांचे पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान असतात. हे कशासाठी? आता पुन्हा पोलिसांना सुट्टी द्या, मुसलमान मारायचे? असे काही ते म्हटले आहेत. कोणी शिकवले हे? त्यांचं काहीतरी चुकतंय. त्यांच्या गोळ्या संपल्यासारखं वाटत आहे, असा टोला मिटकरी यांनी राणेंना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT