NCP Vidhan Sabha 2024 candidate List | Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Candidate List : 'चलो दिल्ली'साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे टाकले दुसरे पाऊल, तब्बल 30 जणांना...

Delhi Assembly Elections NCP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या उमेदवारांच्या यादीत 11 जणांना संधी दिली होती आता दुसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली होती.

Roshan More

NCP Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा काॅन्फीडन्स वाढला आहे. या निकालाच्या काही दिवसातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचा पक्ष दिल्ली विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून 11 उमेदवारांची यादी जाहीर करत दिल्ली विधानसभेसाठी पहिले पाऊले टाकले होते. आता तब्बल 30 उमेदवारांची दुसरी यादी राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीत प्रेम खटाना, इम्रान सैफी,दानिश अली, राजेंद्र पाल,राजेश लोहिया मेहक डेग्रा,जगदीश भगत, संजय मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बुरारी, बादली, रिठाला या मतदारसंघातून अनुक्रमे रतन त्यागी, मुलायम सिंह, लखन प्रजापती यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे.

20 स्टार प्रचारक

राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 20 स्टार प्रचारांकांची नावे घोषित करण्यात आली आहेत. या यादीत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांच्यासह अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी चेहरा असलेले छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना स्टार प्रचाराकांच्या यादीत स्थान मिळाले नाही.

राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी प्रयत्न

दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिल्लीची निवडणूक लढवली जात आहे.

आप विरोध भाजप लढत

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत होत आहे. काँग्रेस पूर्ण तयारीने या निवडणुकीत उतरली आहे. मात्र, काँग्रेसच्या चांगल्या कामगिरीचा फटका आपला बसत भाजपला फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT